TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण थांबवण्यासाठी पारित कायद्यामुळे कायदेशीर आधार मिळाला

महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांचे प्रतिपादन

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2022
in जळगाव, जामनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) : श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण तसेच अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा थांबवण्यासाठी जादूटोणाविरोधी कायद्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच वाळीत टाकलेल्या, बहिष्कार घातलेल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी व जात पंचायत भरवून अन्याय करणाऱ्या पंचांना धडा शिकवण्यासाठी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यामुळे मोठा आधार मिळाला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी केले.

जामनेर पोलीस स्टेशन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा याबाबतची प्रशिक्षण देण्यासंदर्भात कार्यशाळा गुरुवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात आली. प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक किरण शिंदे, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, जामनेर शहराध्यक्ष मनोज महाले, शाखा कार्याध्यक्ष भीमराव दाभाडे, प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे उपस्थित होते.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

प्रस्तावनेमधून कार्यशाळेचा उद्देश प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केला. यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या हस्ते पाण्याचा दिवा पेटवून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी मंत्राने नारळ पेटवणे, नारळातून करणी काढणे आदि चमत्कार दाखवून त्याच्यामागील विज्ञान स्पष्ट केले.

कार्यशाळेत ‘जादूटोणाविरोधी कायदा’ आणि ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ याविषयी जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की,अंनिसने १८ वर्षांच्या दीर्घ संघर्षातून तसेच डॉ. दाभोलकर यांच्या बलिदाननंतर जादूटोणाविरोधी कायदा पारित करण्यात समितीला यश मिळाले. या कायद्यामुळे नरबळी देणं, दैवी शक्ती व गुप्तधनाच्या नावाखाली कोणी फसवणूक करत असेल, लैंगिक शोषण करीत असेल, साप चावल्यावर डॉक्टरऐवजी मांत्रिकाकडे नेत असेल तर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्याच्यावर थेट गुन्हा दाखल होतो.

त्यासाठी आता कायदा मजबूत झाल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. श्रद्धेच्या नावाखाली चालणारे व देवाधर्माचा वापर करून मानसिक, आर्थिक, शारीरिक शोषण करणाऱ्या बाबा-बुवा, अम्मा-माता अशांवर आता थेट कायदेशीर कारवाई करता येते, असेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर अनेक जात व्यवस्थांनी त्यांच्या पंचायती बसवून समाजातील नागरिकांचे शोषण करणे, त्यांना वाळीत टाकणे, त्यांच्यावर बहिष्कार घालणे, त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न करून घेणे, दैनंदिन व्यवहारावर बंदी घालणे अशा गोष्टी केल्या तर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो. समितीने हे दोन कायदे राज्य सरकारकडून पारित केल्याने महाराष्ट्रातील शोषित होत असलेल्या जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

नागरिक आता थेट पोलीस स्टेशनला तक्रार देऊ शकतात. दोषींवर गुन्हे दाखल करू होतात. नागरिकांना कायद्याचं संरक्षण मिळाले, अशी माहितीही यावेळी विश्वजीत चौधरी यांनी दिली.

आभार शाखा कार्याध्यक्ष भीमराव दाभाडे यांनी मानले. पोलीस नाईक सुनील माळी, हवालदार रमेश कुमावत, कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, तुषार पाटील यांच्यासह अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे, कायदेशीर सल्लागार अँड. राजू मोगरे, महिला विभाग सचिव शोभा बोऱ्हाडे, ऋषिकेश शिंदे यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले. यावेळी तालुक्यातील ४३ गावांचे पोलीस पाटील, पोलीस स्टेशन कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची रेशन संघटनेच्या पदाधिकारी यांनी घेतली भेट !

June 30, 2024

जळगावात रमजान ईद उत्साहात साजरी ; विविध सहा ठराव पारित

May 3, 2022

दुर्दैवी ! मकर संक्रांतीच्या दिवशी पतंगांनी घेतला दोघां बालकांचा जीव !

January 14, 2022

पुण्यात ८ लाखांची लाच घेतांना आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड यांना अटक !

June 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group