धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नात्यातीलच मुलासोबत लग्न ठरले. साखरपुडा देखील झाला. परंतु दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. वैद्यकीय तपासणीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे आपल्या आत्याच्या मुलासोबत लग्न ठरले. दोघांचा साखरपुडा देखील झाला. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या घरी दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर मुलीने एरंडोल येथे वैद्यकीय तपासणी केली. त्यातून पीडिता गर्भवती असल्याचे समोर आले. एरंडोलच्या वैद्यकीय तपासणीचा रिपोर्ट पोलिसांकडे आला. त्यामुळे मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संतोष पवार हे करीत आहेत.