सूरत (वृत्तसंस्था) कोरोना रुग्णांसह आता मृतांची संख्याही झपाट्याने वाढत असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह बालकांचा देखील जीव जात आहे. गुजरातमध्ये स्थिती अधिकच भयावह असून येथे १४ दिवसांच्या नवजात बाळाचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. बालकाच्या आईला आधीच कोरोनाची लक्षणे दिसत होती. मात्र त्यांनी ही बाब कोणालाही सांगितली नाही. एवढच नाही तर लक्षणे असताना महिलेने आपल्या बाळाला स्तनपान केले. त्याचा परिणाम बाळावर झाला.
गुजरातच्या सूरत शहरात कोरोनाने अवघ्या १४ दिवसांच्या चिमुकलीचा बळी घेतला आहे. डॉक्टरांनी चिमुकलीला वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आणि चिमुकलीचा मृत्यू झाला. या मुलीला जन्मानंतर दोन दिवसातच कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर प्लाझ्मा थेरपीचा देखील वापर करुन उपचार करण्यात आले. मात्र, तरीही तिचा प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही.
सूरतच्या वराछा येथील डायमंड रुग्णालयात चिमुकलीवर उपचार सुरु होते. चिमुकलीच्या आईला आधीपासूनच कोरोनाची लक्षणे जाणवत होती. मात्र, तिने याकडे दुर्लक्ष केले. याशिवाय तिने कुणालाही सांगितलं नाही. मुलगी जन्माल्यानंतर तिने मुलीला दूध पाजलं. मात्र, तिच्या या चुकीमुळे नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला. जन्मानंतर अवघ्या दोन दिवसात तिला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर तिला डायमंड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.