पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या टहाकळी गावी मध्यरात्री सुनेने अचानक स्वतःला पेटवून घेतल्याचे बघताच सासूही मदतीला धावली. या थरारक घटनेत सुनेचा मृत्यू झाला तर सासू ५० टक्क्याहून अधिक भाजल्या आहेत. ममता सुधीर पाटील (२८), असे मयत सुनेचे तर लीलाबाई रमेश पाटील (५०), असे गंभीररित्या भाजलेल्या सासूचे नाव आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान, ममता पाटील यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सून आगीत होरपळत असल्याचे बघताच मदतीला सासू लीलाबाई ह्या धावल्या. सुनेला वाचविण्यात त्यांना अपयश तर आलेच पण स्वतः देखील या ५०० टक्क्याहून अधिकच्या भाजल्या आहेत. घरात काही तरी भयंकर घडत असल्याचे लक्षात येताच नातेवाईकांसह गावकऱ्यांनी दोघांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, महिलेने स्वतःला का पेटवून घेतले याचं नेमकं कारण समोर समजू शकले नाही. या प्रकरणाची धरणगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.