औरंगाबाद (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीत पदवीधर मतदार संघासाठी आघाडी तयार होण्यास सुरवात झाली आहे. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीने सतीश चव्हाण यांना औरंगाबादमधून उमेदवार घोषित केली तर अरुण लाड यांना पुण्यातून उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
औरंगाबादमधून पुन्हा एकदा सतीश चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत सतीश चव्हाण आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यात लढत झाली होती. यावेळी शिरीश बोराळकर यांनी सतीश चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यामुळे भाजपकडून बोराळकर यांनाच संधी देण्यात आली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर अशी लढत पाहण्यास मिळणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना पोकळे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मूर्ती आणली होती. दुसरे बंडखोर उमेदवार प्रवीण घुगे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपच्या वतीने अधिकृत उमेदवारी शिरीष बोराळकर यांना जाहीर केली असली तरी दोन जणांनी अर्ज भरल्याने पक्ष श्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आली आहे.
पुण्यात भाजपकडून पुणे पदवीधरसाठी संग्राम देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या जागेसाठी महापौर मुरलीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे यांच्याही नावाची चर्चा होती पण, अखेर सर्व नावे वगळून सांगलीच्या संग्राम देशमुख यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यामुळे पुण्यात अरुण लाड विरुद्ध संग्राम देशमुख सामना रंगणार आहे. १ डिसेंबर रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.