पाळधी प्रतिनिधी ता धरणगाव – येथील पाळधी बुद्रुक ग्रा.पं.सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दरम्यान सेवा पंधरवडा निमित्ताने ग्रामसभा आयोजन करण्यात येऊन त्यानंतर गावात शिवारफेरी व जीपीएस स्कूल व जिल्हा परिषद मराठी शाळेत 50 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालय धरणगाव ग्रामपंचायत पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द च्या च्या वतीने करण्यात आले होते यावेळी उपस्थित ग्रामस्थांना या अभियाना अंतर्गत टप्पानिहाय
राबविण्यात येणाऱ्या गाव व शेतरस्ता नोंदणी , घरकुल लाभार्थी यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करणे तसेच विविध महसूल विभागाचे वतीने आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम तसेच श्रमदानातून ग्राम स्वच्छता,ग्रामपंचायत शंभर टक्के कर वसुली,अतिक्रमण जागेत वास्तव्य करणाऱ्या कुटुंबास 2018 19 च्या शासन निर्णयानुसार उतारा देणे, पंतप्रधान आवास योजना लाभार्थ्यांना घरकुलच्या चाव्या देणे,मंजुरी बाकी असलेल्या घरकुलांना मंजुरी देणे, बेघरांना जागा मागणीचे प्रस्ताव सादर करणे, स्मशानभूमीचे बांधकाम करणे, ग्रामपंचायतच्या मंजूर विविध योजना कामाचा शुभारंभ, दिव्यांग योजना, पाणी अडवण्यासाठी बंधारे, आरोग्य शिबिर, गुरांचे लसीकरण, शालेय दाखले,क्रीडा स्पर्धा अशा विविध योजना संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्याकडून करून घेण्यात येणार असल्याबाबत ची माहिती ग्रामसभेत देण्यात आली.
याप्रसंगी जि प सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंदराव नन्नवरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यासोबतच एरंडोल प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी गटविकास अधिकारी किशोर वानखेडे सरपंच विजय पाटील विस्तार अधिकारी कैलास पाटील ग्रामसेवक दीपक पाठक उपसरपंच मच्छिंद्र साळुंखे अरुण पाटील ग्रा.प.सदस्य अनिल कासट निसार देशमुख कैलास इंगळे चंदू इंगळे बंडू नारखेडे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण शरद कोळी गोपाल सोनवणे तलाठी कोतवाल अंगणवाडी सेविका अशा वर्कर महिला पुरुष ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.













