धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात जनता कर्फ्यूनंतर लागलेल्या लॉकडाऊननंतर आज पूर्ण दुकाने उघडताच गावाला यात्रेचे स्वरूप आले.
गेल्या सात दिवसापासून जनता कर्फ्यू, लॉक डाऊन लागलेले होते. त्यामुळे पूर्णपणे गाव बंद होते. मात्र, आज धरणगाव उघडल्यावरगावाला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. यावेळी धरणगावकरांनी सर्व नियम धाब्यावर बसवलेले दिसून येत होते.
कोरोना महामारीमुळे हा निर्णय धरणगाव प्रांत. विनय गोसावी, तहसीलदार नितींकुमार देवरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, व गावातील व्यापारी मंडळी घेऊन हा निर्णय घेण्यात आला. मात्र आज पूर्ण धरणगाव तालुका उघडल्यावर जणू यात्रेचे स्वरूप धरणगाव तालुक्याला प्राप्त झालेले दिसून आले. दुकाने बँक मॉल याठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी होती. कोरोना महामारीमुळे आपण याठिकाणी संकटात आले असून तरी लोक बिनधास्त फिरताना दिसून येतात. त्याचप्रमाणे सोशल डिस्टंसिंगचे पालन याठिकाणी केले जात नव्हते, तसेच मार्क्स अवैद्य वाहतूक तीनमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून येत होती. बाजारपेठेत बाजार भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दीला यात्रेचे स्वरूप याठिकाणी दिसून येत होते.