TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भूजल व्यवस्थापनासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

भूजल भवन येथील भूजल जागृती प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सध्याच्या परिस्थितीत भूजल टंचाई व पर्यायाने भूजलाचे महत्त्व वाढत असल्यामुळे भूजल व्यवस्थापनाविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पाटील यांच्या हस्ते पुणे येथे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या मुख्यालयातील (भूजल भवन येथील) नूतनीकृत भूजल जागृती प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन झाले. भूजल जागृती प्रदर्शनी ही शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, जलसुरक्षक, ग्रामसेवक यासारख्या ग्रामीण स्तरावर कार्यरत शासकीय कर्मचारी आणि ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्यासाठी उद्बोधक ठरेल असा विश्वास पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यरत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही महाराष्ट्र राज्यातील भूजल संबंधित शिखर यंत्रणा आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाद्वारे भूजलाचा अंदाज काढणे, संभाव्य टंचाईग्रस्त गावांचा अंदाज काढणे, ग्रामीण भागातील भूजल आधारित पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शाश्वततेसाठी विविध स्त्रोत बळकटीकरणाच्या उपाययोजना राबविणे, समुदाय सहभागातून भूजल संपत्तीचे व्यवस्थापन आणि नियमन करणे, भूजल गुणवत्तेचे संनियंत्रण इत्यादी भूजल संबंधित अनेक महत्त्वाच्या योजना राबविण्यात येतात.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त

भूजल जागृती प्रदर्शनीमध्ये भूजलाची उपलब्धता व हालचाल, भूजल उपश्यांच्या विविध उपाययोजना, भूजल पुनर्भरणाच्या विविध उपाययोजना, भूस्तर व जलधारक संरचना इत्यादी दर्शविणारे विविध मॉडेल्स प्रदर्शित केलेले आहेत. हे प्रदर्शन भूजल विज्ञान आणि भूजल दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनाही भूजलाचा अभ्यास करताना निश्चितच लाभ होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, केंद्रीय भूमिजल मंडळ नागपूर येथील विभागीय संचालक डॉ. पी.के. जैन तसेच युनिसेफचे युसुफ कबीर आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

शहरातील रस्त्यातील वादग्रस्त अतिक्रमण हटविण्यात यावे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केंद्रीय पथकापुढे जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले सादरीकरण !

December 14, 2023

किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर खंडणीचा आरोप; पोलिसांकडून चौकशी

January 31, 2021

मानहानीचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनावर कारवाई व्हावी : विष्णु भंगाळे

January 23, 2021

जळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर साधारण तिकीट व आरक्षण तिकीट खिडकी सुरू करावी मनसेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी !

October 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group