चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांना मुबलक रेमडेसिवीर व ऑक्सिजन मिळावा यासाठी विविध संघटनांनी जनआंदोलन उभारून उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
चाळीसगाव शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांना मुबलक रेमडेसिवीर व ऑक्सिजन मिळावा यासाठी संभाजी सेना, सहयाद्री प्रतिष्ठान, वर्धमान भाऊ, धाडीवाल मित्र मंडळ, समता सैनिक दल, वीरशैव लिंगायत, गवळी समाज यांनी दि. १९ एप्रिल रोजी शासनास निवेदनाद्वारे मागणी केली होती की, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा न झाल्यास उग्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारून उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून तश्या आशयाचे तहसीलदार चाळीसगाव यांचे सहीचे पत्र शासनामार्फत चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांनी दिले. पत्र स्वीकरतांना वर्धमान भाऊ धाडीवाल सहयाद्री प्रतिष्ठानचे दिलीपभाऊ घोरपडे, संभाजी सेनेचे बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ आदी उपस्थित होते. तरी उद्या दि. २३ एप्रिल रोजीचे जन आंदोलन शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनामुळे स्थगित करण्यात आले आहे. याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी.
















