जळगाव (प्रतिनिधी) – राज्यातील बालकांपर्यंत मराठी संस्कृतीची व परंपरांची महती पोहचावी. त्यांनी लोककलांचा अभ्यास करुन ही परंपरा पुढे जोपासावी या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेतर्फे दरवर्षी ‘जल्लोष लोककलेचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे २८ व २९ नोव्हेंबर रोजी भैय्यासाहेब गंधे सभागृहात ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
लोककलांचा प्रगल्भ वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी व लोककलांचे केवळ मनोरंजनात्मक स्वरुप न राहता या कलांची महती बालकांपर्यंत पोहचून गायन, वादन, नृत्य क्षेत्रात त्यांनी कौशल्य प्राप्त करावे हा या महोत्सवाचा उद्देशाने महोत्सवात गायन, वादन व नृत्य कला यांचा समावेश केला होता. यात समूह लोकगीत गायन, समूह लोकनृत्य, एकल लोकगीत गायन, एकल लोकवाद्य वाद्यवादन व एकल लोकनृत्य स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धातून जिल्हाभरातील ६५७ बालकलावंतांनी आपले सादरीकरण केले. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या स्पर्धात्मक महोत्सवातील सादरीकरणाचे परीक्षण करण्यासाठी डॉ.सुचित्रा लोंढे, प्रा.सचिन भिडे, संकेत वारूळकर, शाहीर कल्याण उगले (जालना), डॉ.शलाका निकम आदी उपस्थित होते.
बालकलावंतांनी नृत्य, गायन व वादनाच्या माध्यमातून लोककलांचा जल्लोष केला. दि. २९ ला सायंकाळी स्पर्धात्मक महोत्सव संपन्न झाल्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, उद्योजक कुशल गांधी, विनोद चौधरी, जळगाव शाखेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष नेहा पवार, कोषाध्यक्ष सचिन महाजन, आकाश बाविस्कर, हर्षल पवार, मोहित पाटील, पंकज बारी यांच्यासह बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेचे पदाधिकारी व सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
या स्पर्धात्मक महोत्सवात लोकगीत समूह नृत्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट – अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, उत्कृष्ट – कै.श्रीमती ब.गो.शानभाग माध्यमिक विद्यालय, सावखेडा बु।।, उत्तम – ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय, प्रशंसनीय – गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर, प्रशंसनीय – ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालय, प्रशंसनीय – स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय आव्हाणे शिवार, लोकगीत समूह गायनात सर्वोत्कृष्ट – विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, उत्कृष्ट – ओरिय सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडीयम स्कूल, उत्तम – कै. श्रीमती ब.गो. शानभाग प्राथमिक विद्यालय, सावखेडा, प्रशंसनीय – अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, प्रशंसनीय – नाट्यरंग संस्था, जळगाव यांना प्रदान करण्यात आले.
एकल सादरीकरणात लोकगीत गायनात सर्वोत्कृष्ठ – निर्गुणी बारी, उत्कृष्ठ – शर्वा जोशी, उत्तम – ईशान योगेश भालेराव, प्रशंसनीय – आराध्य भूषण खैरनार, प्रशंसनीय – वैभवी बगाडे, लोकवाद्य वादनात – सर्वोत्कृष्ठ – ईशान योगेश भालेराव, उत्कृष्ठ – उदय पाटील, उत्तम – प्रयास सपकाळे, प्रशंसनीय – लोकेश महाजन, प्रशंसनीय – साहिल मोरे, एकल नृत्य स्पर्धेत – सर्वोत्कृष्ठ – मिस्टी भाटिया, उत्कृष्ठ – पायल दत्तू राठोड, उत्तम – दुर्वा प्रसाद देसाई, प्रशंसनीय – श्लोक गवळी, प्रशंसनीय – निधी किशोर पाटील आदी बालकलावंतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष नेहा पवार, आकाश बाविस्कर यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
















