TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यतील ६५७ बालकलावंतांच्या सादरीकरणाने रंगला जल्लोष लोककलेचा

बालरंगभूमी परिषदेच्या उपक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळ्याने समारोप

vijay waghmare by vijay waghmare
November 30, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – राज्यातील बालकांपर्यंत मराठी संस्कृतीची व परंपरांची महती पोहचावी. त्यांनी लोककलांचा अभ्यास करुन ही परंपरा पुढे जोपासावी या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेतर्फे दरवर्षी ‘जल्लोष लोककलेचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे २८ व २९ नोव्हेंबर रोजी भैय्यासाहेब गंधे सभागृहात ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

लोककलांचा प्रगल्भ वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी व लोककलांचे केवळ मनोरंजनात्मक स्वरुप न राहता या कलांची महती बालकांपर्यंत पोहचून गायन, वादन, नृत्य क्षेत्रात त्यांनी कौशल्य प्राप्त करावे हा या महोत्सवाचा उद्देशाने महोत्सवात गायन, वादन व नृत्य कला यांचा समावेश केला होता. यात समूह लोकगीत गायन, समूह लोकनृत्य, एकल लोकगीत गायन, एकल लोकवाद्य वाद्यवादन व एकल लोकनृत्य स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धातून जिल्हाभरातील ६५७ बालकलावंतांनी आपले सादरीकरण केले. उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या स्पर्धात्मक महोत्सवातील सादरीकरणाचे परीक्षण करण्यासाठी डॉ.सुचित्रा लोंढे, प्रा.सचिन भिडे, संकेत वारूळकर, शाहीर कल्याण उगले (जालना), डॉ.शलाका निकम आदी उपस्थित होते.

READ ALSO

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

बालकलावंतांनी नृत्य, गायन व वादनाच्या माध्यमातून लोककलांचा जल्लोष केला. दि. २९ ला सायंकाळी स्पर्धात्मक महोत्सव संपन्न झाल्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, उद्योजक कुशल गांधी, विनोद चौधरी, जळगाव शाखेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष नेहा पवार, कोषाध्यक्ष सचिन महाजन, आकाश बाविस्कर, हर्षल पवार, मोहित पाटील, पंकज बारी यांच्यासह बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेचे पदाधिकारी व सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
या स्पर्धात्मक महोत्सवात लोकगीत समूह नृत्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट – अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, उत्कृष्ट – कै.श्रीमती ब.गो.शानभाग माध्यमिक विद्यालय, सावखेडा बु।।, उत्तम – ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय, प्रशंसनीय – गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर, प्रशंसनीय – ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालय, प्रशंसनीय – स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय आव्हाणे शिवार, लोकगीत समूह गायनात सर्वोत्कृष्ट – विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, उत्कृष्ट – ओरिय सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडीयम स्कूल, उत्तम – कै. श्रीमती ब.गो. शानभाग प्राथमिक विद्यालय, सावखेडा, प्रशंसनीय – अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, प्रशंसनीय – नाट्यरंग संस्था, जळगाव यांना प्रदान करण्यात आले.

एकल सादरीकरणात लोकगीत गायनात सर्वोत्कृष्ठ – निर्गुणी बारी, उत्कृष्ठ – शर्वा जोशी, उत्तम – ईशान योगेश भालेराव, प्रशंसनीय – आराध्य भूषण खैरनार, प्रशंसनीय – वैभवी बगाडे, लोकवाद्य वादनात – सर्वोत्कृष्ठ – ईशान योगेश भालेराव, उत्कृष्ठ – उदय पाटील, उत्तम – प्रयास सपकाळे, प्रशंसनीय – लोकेश महाजन, प्रशंसनीय – साहिल मोरे, एकल नृत्य स्पर्धेत – सर्वोत्कृष्ठ – मिस्टी भाटिया, उत्कृष्ठ – पायल दत्तू राठोड, उत्तम – दुर्वा प्रसाद देसाई, प्रशंसनीय – श्लोक गवळी, प्रशंसनीय – निधी किशोर पाटील आदी बालकलावंतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष नेहा पवार, आकाश बाविस्कर यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
Next Post

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य 01 डिसेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खा.राऊत यांच्यावरील ईडी कारवाईच्या निषेधार्थ जळगावात शिवसैनिक आक्रमक !

August 1, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

January 13, 2021

शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू !

October 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group