हाथरस (वृत्तसंस्था) हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, पोलिस माझ्या बहिणीचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पीडितेच्या मोठ्या भावाने केला आहे.
हा आमच्याविरोधात रचलेला कट आहे. मारेकरी अतिशय चतुर आहेत. स्वत:ला वाचवण्यासाठी ते काहीही करू शकतात, असे पीडितेच्या भावाचे म्हणणे आहे. १० वर्षांपूर्वी आपण वडिलांसाठी एक सिम विकत घेतले होते, मात्र त्यांचा फोन नेहमची हरवायचा. यासाठी आपण आपल्या आयडीने सिम विकत घेतले. हा फोन नेहमीच घरीच असतो. गावातील सर्वांकडे, इतकेच काय पण ग्रामप्रमुखांकडेदेखील आमचा हा एकच नंबर आहे, अशी माहिती पीडितेच्या भावाने दिली. या फोनचा उपयोग अधिकतर वडिलच करतात. मात्र, मुख्य आरोपी संदीप याने कधीही संपर्क केला नसल्याचे पीडितेचा भाऊ म्हणाला. संदीप हा पीडितेच्या घराकडे येणाऱ्या रस्त्याच्या पलिकडील भागात राहतो.
‘आम्हाला बहिणीवर संशय नाही’
पोलिस माझ्या बहिणीचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पीडितेच्या मोठ्या भावाने केला आहे. नेहमीच ते माझ्या बहिणीवर नजर ठेवून असायचे. मला माझ्या बहिणीवर कोणताही संशय नाही, असे पीडितेचा मोठा भाऊ म्हणाला. माझी बहीण शिकलेली नव्हती. तिला फोन नंबर देखील डायल करता येत नसे. तिला फोन उचलता देखील यायचा नाही, अशी माहिती पीडितेच्या छोट्या भागाने दिली.