TheClearNews.Com
Sunday, June 29, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजकारण व समाजकारणात युवकांची भूमिका महत्वाची : ना. गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत युवासेनेच्या आठ शाखांचे उदघाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा मूलमंत्र देऊन सुरू केलेल्या पक्षाचे कार्य आज प्रचंड प्रमाणात विस्तारले असून यात युवकांचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे. यामुळे युवा सैनिकांनी जनहिताची कामे करून पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत परिणामकारक पध्दतीत पोहचवण्याचे काम करावे असे आवाहन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच राजकारणात युवकांची भूमिका ही अतिशय महत्वाची असल्याचंही ते म्हणाले.

तालुक्यातील बिलखेडा, सारवे, जांभोरे, भोणे आणि कंडारी येथे आठ युवा सेनेच्या शाखांच्या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बिलखेडा येथे जाहीर कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. याच कार्यक्रमात परिसरातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.

READ ALSO

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

बिलखेडा येथे जाहीर सभा

याप्रसंगी बिलखेडा येथे मनोगत व्यक्त करतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शाखा हा शिवसेनेचा आत्मा आहे. शिवसेनेची शाखा हे समाजकार्य करण्याचे एक मोठे माध्यम होते आणि आजही आहे. याला आता युवासेनेची जोड मिळालेली आहे. खरं तर राजकारणात युवकांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. युवकांनी राजकारणाकडे सकारात्मकतेने पहावे, आणि समाजसेवेचे एक उत्तम माध्यम म्हणून याचा वापर करावा. प्रत्येक युवासेनेच्या शाखेने आपला फलक लावावा. यावर पक्षाची ध्येय-धोरणे, विचार, ताज्या घडामोडी आणि राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती ठळकपणे नमूद करावी. कोविडच्या काळात शिवसेना आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली असून कोविड पश्‍चात काळात देखील याच प्रकारे भूमिका बजवावी असे आवाहन करून बिलखेडा गावात आजवर सुमारे दीड ते दोन कोटी रूपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळालेली आहे. येत्या काळात व्यायामशाळा, स्मशानभूमि, बिलखेडा ते सारवे रस्ता या कामांना मार्गी लावणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. जलजीवन मिशनच्या माध्यमातून येथील पाणी पुरवठा योजनेला गती देण्यात येणार असल्याचे आश्‍वासन देखील त्यांनी दिले. तर, आम्ही तर पाणी पाजूच….मात्र आपण आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद द्यावा असे पालकमंत्री मिश्कीलपणे बोलताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर पसरली. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज तालुक्यातील बिलखेडा, सारवे, जांभोरे, भोणे आणि कंडारी येथे युवासेनेच्या आठ शाखांचे उदघाटन करण्यात आले.

अशी आहे युवासेनेच्या शाखांची कार्यकारणी

बिलखेडा येथील शाखाप्रमुख गोपाल पाटील तर उपशाखाप्रमुख समाधान पाटील तर दुसर्‍या शाखेचे प्रमुख अनिल सोनवणे आणि उपशाखाप्रमु्ख सुनील पिंपळे यांची नावे जाहीर करण्यात आली. यासोबत जांभोरा येथील शाखाप्रमुख शुभम चव्हाण तर उपशाखाप्रमुख स्वप्नील परदेशी, सारवे येथे शाखाप्रमुख किशोर पाटील आणि उपशाखाप्रमुख समाधान पाटील, कंडारी येथे शाखाप्रमुख युसुफ पटेल आणि उपशाखाप्रमुख शाहरूख पटेल यांची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. भोणे येथे युवासेनेच्या दोन शाखा उघडण्यात आल्या असून यातील एका शाखेचे प्रमुख गजानन फुलपगार आणि उपशाखाप्रमुख प्रदीप पाटील तसेच दुसर्‍या शाखेचे प्रमुख शरद पाटील आणि उपशाखा प्रमुख महेश पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या सर्वांचे पालकमंत्र्यांसह सर्व शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

या कार्यक्रमात परिसरातील अरूण भदाणे, निलेश भदाणे, रावसाहेब भदाणे, सागर राजपूत; सागर भदाणे, मोहन भदाणे, यांच्यासह इतरांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच बिलखेड्याचे मूळ रहिवासी असणारे राजेंद्र भदाणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बिलखेडा येथील शाळेच्या वॉल कंपाऊंडसह डिजीटल वर्गाचे लोकार्पण देखील ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, नगरपालिका गटनेते पप्पू भावे, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील, उपतालुका भाऊसाहेब पाटील, दिपक भदाणे, डॉ. संदीप पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील, पं. स. सभापती प्रेमराज पाटील, माजी सभापती डी. ओ. पाटील, नवल पाटील , ज्येष्ठ पदाधिकारी, पुरूषोत्तम पाटील, सरपंच डॉ. दीपाली काटे-पाटील, उप दिलीप पाटील, महिला आघाडी जनाआक्का पाटील, उपतालुका प्रमुख मोतीआप्पा पाटील, प्रमोद पाटील भानुदास पाटील, मोहन पाटील, भगवान पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त शिक्षक देविदास भदाणे यांनी केले. त्यांनी गावात व परिसरात विकासनिधी दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन उपशिक्षक योगेश्‍वर भदाणे यांनी केले. तर आभार युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील व सरपंच दीपाली काटे-पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

June 27, 2025
गुन्हे

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

June 26, 2025
जळगाव

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

June 24, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
Next Post

चाळीसगावात पावसाचा पुन्हा कहर, तितुर डोंगरीला पुन्हा पूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याच्या आमिषाने सव्वादोन कोटींची फसवणूक ; दोघे भामटे जळगाव सायबरच्या जाळ्यात !

May 4, 2024

नवनीत राणा यांचं अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट ; म्हणाले…!

April 27, 2022

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्याने सपत्नीक घातले महादेवाला साकडे !

November 22, 2024

वि.का.सोसायट्यांमार्फतच पिक कर्ज वितरित करावे : रोहिणीताई खडसे यांची मागणी !

April 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group