TheClearNews.Com
Sunday, November 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाचे राज्यमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

ह्दयविकाराचा झटका आणि वेळीच उपचाराच्या जनजागृती प्रशिक्षणामुळे जीव वाचविण्यास मदत होईल : राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2021
in आरोग्य, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आय केअर संस्था आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाच्या दूरदृश्यपणालीद्वारे प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन राज्यमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेला देखील काही वेळा समजत नाही. हृदयविकार नेमका कसा ओळखायचा इतपासून ते हृदयविकाराचे प्रकार आणि तातडीचे प्राथमिक उपचार याची माहिती असणे गरजेचे आहे. आणि अशा माहितीसह प्रशिक्षणाचा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘आय केअर’ संस्थेच्या सहकार्याने अधिकारी-कर्मचारी तसेच राज्यातील सर्व माध्यमकर्मींसाठी आयोजित केला तो अत्यंत स्तुत्य व अभिनंदनीय आहे, असे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी काढले.

READ ALSO

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, संचालक(प्रशासन) गणेश रामदासी, संचालक (वृत्त) दयानंद कांबळे, आय केअरचे डॉ.यश लोखंडवाला (हृदयरोग तज्ज्ञ), डॉ.ब्रायन पिंटो(कार्डियोलॉजिस्ट), डॉ.किंजल गोयल (मानसोपचारतज्ज्ञ), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत राज्यातील अधिकारी -कर्मचारी व पत्रकार ऑनलाईन सहभागी झाले होते.

अल्प व मध्यमवयीन नागरिक सुध्दा या अकस्मात हृदयरोगाला बळी पडत आहेत. हृदयाचा झटका आणि कार्डियाक अरेस्टची घटना आपल्या आजूबाजूला घडत असते तेव्हा अशा प्रकारचे कार्डिओ पल्मोनरी रिसिटेशन (सीपीआर)चे माहिती व प्रशिक्षण असेल तर काही मिनिटाच्या सुवर्णकाळात आपण त्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतो यासाठी प्राथमिक उपचाराची माहिती असणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट जनजागृतीमुळे नागरिकांचा जीव वाचविण्यास मदत होईल असेही राज्यमंत्री कु.तटकरे यांनी सांगितले.

बदलत्या जीवनशैलीत आरोग्यविषयक जागृत राहणे आवश्यक – डॉ.दिलीप पांढरपट्टे

बदलत्या जीवनशैलीमध्ये तणाव वाढल्याने अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे. या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्य विषयक जागृत राहून तणामुक्त आणि आरोग्यदायी जीवन कसे जगले पाहीजे याचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी या प्रशिक्षण सत्रांचे प्रास्ताविक करताना सांगितले.

डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, बदलत्या माध्यमांनुसार आणि माध्यमातील स्पर्धेमुळे पत्रकारांचे आयुष्य धकाधकीचे आणि धावपळीचे झालेले आहे. महासंचालनालयाचे कामही तसे शासकीय परंतु पत्रकारीतेचे आहे असे म्हटले जाते. माध्यमातील लोकांना सतत कार्यरत राहून सतर्क रहावे लागते. यामुळे ताण वाढतो त्याने अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात.त्यासाठी आरोग्यविषयक जागृत राहणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्टच्या प्राथमिक उपचारासाठी कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) हे माहितीपूर्ण प्रशिक्षण आपल्या जवळच्या मित्राचे, नातेवाईकांचे प्राण वाचविण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला व अशा प्रकारचा जनजागृती व जनसंपर्काच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.

हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियाक अरेस्टची घटना आपल्या अवतीभोवती घडल्यास कशाप्रकारे तातडीने तीन मिनिटांमध्ये चार टप्प्यातील तातडीची वैद्यकीय मदत केल्यास मृत्यु टाळता येऊ शकतो. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने उद्घाटनाचा प्रशिक्षण कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासोबत आय केअरने शनिवारी आयोजला होता. या प्रशिक्षणामध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येणाऱ्या पिडीतांना वैद्यकियदृष्ट्या मेंदू मृत होण्यापासून बचाव करण्यासाठी योग्यवेळी सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) म्हणजेच हाताने हृदयावर दाब देणे शक्य तितक्या लवकर सुरू करणे गरजेचे आहे, सीपीआर आणि शॉक मशीन (एईडी मशीन)चा वापर करण्याचेही प्रशिक्षण दूरदृश्य माध्यमाव्दारे दिले. जेणेकरून आपल्या जवळची व्यक्ती किंवा नातेवाईकाचे प्राण वाचविण्यास सहकार्य करता येईल.

डॉ.सुमय्या राघवन आणि डॉ.आनंद श्रीवास्तव यांनी दूरदृश्यमाध्यमाव्दारे ह्दयविकाराचा झटका व कार्डियाक अरेस्ट यातील फरक कसा ओळखावा आणि तीन मिनिटांमध्ये रुग्णाचा उपचार सुरु करणे आवश्यक आहे. याचे चार टप्प्यांमध्ये सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणानंतर आय केअरचे डॉ.यश लोखंडवाला (हृदयरोग तज्ज्ञ), डॉ.ब्रायन पिंटो (कार्डियोलॉजिस्ट), डॉ.किंजल गोयल (मानसोपचारतज्ज्ञ) यांनी यावेळी अकस्मात हृदयरोग या विषयावर मार्गदर्शन केले व वेबिनार मध्ये सहभागी झालेल्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. दरम्यान सुरुवातीला हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियाक अरेस्ट या संदर्भातील सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) प्रशिक्षणाची उपयुक्तता संदर्भात क्रिकेटर सुनील गावस्कर, सिनेअभिनेता आमीर खान, कार्तिक आर्यन, अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांचा जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात आला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

November 12, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ॲड. वसंतराव भोलाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 31, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, २ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026

धरणगावात उपजिल्हा रूग्णालयाला मंजुरी !

October 4, 2023

महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाची जागतिक दखल

August 29, 2025

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी २५०० मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प !

January 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group