जळगाव (प्रतिनिधी) मुसळधार पावसामुळे भिंतीचा घेतलेला आडोसा एकाच्या जिवावर बेतला आहे. शिवाजीनगर परिसरातील महावीर जिनिंगची भिंत कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, सुरक्षारक्षकाची ओळख पटलेली नाहीय.
शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही भागात गारपीट देखील झाली. मुसळधार पावसापासून बचावासाठी शिवाजीनगर परिसरातील महावीर जिनिंगच्या संरक्षक भिंतीजवळ एक सुरक्षारक्षक सायकलसह उभा होता. परंतू तेवढ्यात अचानक जिनिंगची भिंत कोसळली. या भिंतीच्या ढिगाराखाली दबून त्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी त्या सुरक्षारक्षकाला ढिगा-याखालून बाहेर काढून जिल्हा रूग्णालयात नेले. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षारक्षकाच्या शर्टावर सत्यनारायण सिक्युरिटी ॲण्ड मॅन पॉवर सिर्व्हीसेस असे लिहिलेले असून पोलीस कर्मचारी मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न करत आहेत.
















