जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांनी स्वत:हून पुढे आले पाहिजे. पदाधिकारी व सरपंचानी जनतेशी सतत संपर्क ठेऊन त्यांच्या समस्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहा. शिवसैनिक नोदणी, बूथ प्रमुख यादी अपडेट ठेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्येक गावात केलेल्या विकास कामांप्रमाणे गाव तिथे शाखेसाठी सांघिक प्रयत्न करण्यचे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. तर सभासद नोंदणीवर भर देऊन कार्यकर्त्यांनी जळगाव ग्रामींणवर भगवा फडकविण्यासाठी आत्तापासून सज्ज राहण्यचे आवाहन जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी केले. ते सरदार वल्लभभाई पटेल हॉल येथे आयोजित जळगाव तालुका शिवसेनेच्या बैठकी प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील होते. तालुका बैठकीचे आयोजन तालुका प्रमुख शिवराज पाटील व पदाधिकारी यांनी केले होते.
यांची होती उपस्थिती !
जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, महिला आघाडीचे संपर्कप्रमुख सरलाताई कोल्हे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर , उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, अनिल भोळे, तुषार महाजन, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख किशोर चौधरी, माजी सभापती नंदलाल पाटील, मुकुंदराव नन्नवरे, जनाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील, , दूध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील, पी.के.पाटील, महेश चौधरी, जितू पाटील, राजू पाटील, शेनफडू पाटील, संजय घुगे, साहेबराव वराडे, युवसेनेचे पदाधिकारी हर्शल नारखेडे, स्वप्नील परदेशी, अजय महाजन, रामकृष्ण काटोले, गोपाल पाटील यांच्यासह तालुक्यातील विभागप्रमुख, शाखा प्रमुख, सरपंच, ग्रा .पं. सदस्य , तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीलाजिल्हा प्रमुख निलेश पाटील व प्रतापराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. बैठीकीचे रुपांतर मेळाव्यात झाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका प्रमुख शिवराज पाटील यांनी तालूक्याती संघटने विषयी सविस्तर माहिती विषद करून गाव तिथे शाखा करण्यसाठी नियोजन असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन वराडचे उपसरपंच व माजी सैनिक संदीप सुरळकर यांनी केले. तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.