TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केल : देवेंद्र फडणवीस

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना राज्य सरकार कोणतीही मदत दिली नाही. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, अशी टीका फडणवीस यांनी केली. ते शेतकरी संवाद यात्रेदरम्यान पुण्यात बोलत होते.

दिल्लीच्या वेशीवर गेल्या एक महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरु असताना भाजपाकडून संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत आणि खासकरुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाकडून संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याच्या वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. देवेंद्र फडणवीस पुण्याच्या मांजरी बुद्रूक येथे शेतकरी संवाद यात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी नव्या कृषी कायद्यांचं समर्थन केलं. “नरेंद्र मोदी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रानस्फर करणार आहेत. आमच्या शेतकऱ्याला मुक्ती मिळाली पाहिजे, जिथे माल विकायचा आहे तिथे विकता आला पाहिजे आणि त्यासाठी बंधन नसलं पाहिजे. शेतकऱ्याला मालक बनवण्यासाठी मोदींनी हे कायदे आणले आहेत,” असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं. “जेव्हा लॉकडाउन सुरु होता तेव्हा कोकणातील शेतकऱ्यासमोर आंब्याचं काय होणार हा प्रश्न होता. पण आपण फळे नियमनमुक्त केल्याने शेतकऱ्याला मुंबईच्या सोसायट्यांमध्ये माल विकता आला. आंब्याच्या बागायतादारांनी मला साहेब जितका पैसा लॉकडाउनध्ये कमावला तितका याआधी कमावला नसल्याचं सांगितलं. कारण आम्ही सोसायट्यांमध्ये माल विकू शकलो,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

“काही लोकं तर दुटप्पी भूमिका घेतात. कंत्राटी शेतीचा कायदा महाराष्ट्राने २००६ मध्ये केला. मोदींनी देशासाठी जो कंत्राटी शेतीचा कायदा केला आहे तो २००६ सालीच राज्यात झाला आहे. २००६ ते २०२० पर्यंत १४ वर्षात कुठेही शेतकऱ्याची शेती गेली, लुबाडलं, नुकसान झालं अशी एकही घटना झाली नाही,” असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं. “मोदींनी जो कायदा आणला आहे त्यात वाद झाला तर शेतकरी न्यायालयात जाऊ शकतो असं स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्राच्या कायद्यात कुठेही जाण्याची मुभा नाही. नव्या कायद्यात शेतकरी जाऊ शकतो पण व्यापारी कोर्टात जाऊ शकत नाही. शेतकऱ्याला संरक्षण देणारा कायदा मोदींनी तयार केला आहे,” असं ते म्हणाले.

ठाकरे सरकारच्या कर्जमाफीवरदेखील फडणवीस यांनी जोरदार टीका केली. ‘आम्ही केलेल्या कर्जमाफीला नाव ठेवत महाविकास आघाडी सरकारनं कर्जमाफीची योजना तयार केली. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आम्ही केलेल्या कर्जमाफीचा लाभ ४२ लाख शेतकऱ्यांना झाला होता. मात्र यांची कर्जमाफी २९ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह दिला होता. यांनी मात्र प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला,’ अशा शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी सरकारचा समाचार घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाद विकोपाला : भांडणाच्या रागात पती-पत्नीने एकमेकांना घेतलं पेटवून

January 16, 2022

भुसावळ मुख्याधिकारी विरुद्धच्या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र ; नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी केली होती तक्रार !

December 4, 2021

दिल्लीत ऑक्सिजनअभावी डॉक्टरसहित ८ रुग्णांचा मृत्यू

May 1, 2021

जळगावात खडसेंच्‍या विजयासाठी महादेवाला दुग्‍धाभिषेक करत घातले साकडे

June 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group