भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी पिस्टल खरेदी करणाऱ्या छत्रपती संभाजी नगरातील संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. तर शस्त्र विक्री करणारा भुसावळातील संशयित मात्र पसार झाला आहे.
योगेश नंदू सांगळे (२९, छत्रपती संभाजीनगर), असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तर दुसरा संशयित मात्र पसार होण्यात यशस्वी झाला आहेत. सदर कारवाई पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार निलेश चौधरी, विजय नेस्कर, सागर वंजारी, सचिन पोळ आदींच्या पथकाने केली. योगेश सांगळे याच्याकडून ६० हजार रुपये किंमतीचे दोन पिस्टल जप्त केले. हवालदार निलेश चौधरी हे तपास करीत आहेत.