नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रेम हे अंधळ असतं असं म्हणतात. त्याला काय योग्य आणि काय अयोग्य याची जाण राहात नाही. परिमाणी प्रेमाच्या नादात तो चुकीच्या व्यक्तीवर देखील विश्वास ठेवतो. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. एका व्यक्तीला त्याच्या प्रेयसीनं फसवलं. या प्रेयसीनं आधी प्रियकराची एक किडनी घेतली आणि त्यानंतर ब्रेकअप केलं. या प्रियकराने एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली.
द सन वेबसाईच्या रिपोर्टनुसार, मेक्सिकोमध्ये राहणारा शिक्षक उजिएल मार्टिनेज याने नुकतंच आपल्या टिकटॉकवरुन एक धक्कादायक घटना शेअर केली. जी ऐकून सगळेच शॉक झाले. त्याने सांगितलं, की त्याने आपल्या गर्लफ्रेंडच्या आईला आपली एक किडनी दान केली मात्र, यानंतर जे काही घडलं, ते हैराण करणारं होतं. उजिएलने सांगितलं की त्याने आपल्या गर्लफ्रेंडच्या आईला आपली किडनी दिली. मात्र, ऑपरेशननंतर एका महिन्यातच त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यासोबत ब्रेकअप केला आणि दुसऱ्यासोबत लग्न केलं. यामुळे या व्यक्तीला मोठा धक्का बसला. टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो सोफ्यावर झोपलेला दिसत असून अतिशय नाराज आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि या व्यक्तीला दुःखी न होण्याचा सल्ला लोक देत आहेत. एका व्यक्तीने म्हटलं, की तुला दुःखी होण्याची गरज नाही. कारण या महिलेनं एका अतिशय उदार व्यक्तीला गमावलं आहे. दुसऱ्या एकाने या व्यक्तीला सल्ला दिला की आता आयुष्यात पुढे जा आणि अशा व्यक्तीला निवड जी तुला आपलं मानेल आणि तुझं कौतुक करेल.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने या व्हिडिओनंतर आणखी एक नवा व्हिडिओही शेअर केला आहे. यात त्याने सांगितलं, की त्याचे आपल्या एक्स गर्लफ्रेंडसोबत अजूनही चांगले संबंध आहेत. त्याने सांगितलं की मी आणि माझी एक्स गर्लफ्रेंड दोघंही इमोशनली बरोबर आहोत. मला तिच्याबद्दल काहीही तक्रार नसल्याचं त्याने म्हटलं. आम्ही आता एकत्र नसलो तरीही एकमेकांचा तिरस्कार करत नसल्याचं त्याने सांगितलं.















