धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल रस्त्यावरील बोहरा कब्रस्तान लगत ठेवलेले दीड लाखांचे बांधकाम साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश पुरुषोत्तम माळी (वय-३७ वर्ष धंदा-फर्निचरव्यवसाय, रा. परीहार नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धरणगावात सुरु असलेल्या शोरुमच्या बांधकामासाठी एरंडोल रस्त्यास संताजी नगर जवळील बोहरा कब्रस्तानच्या बाजूला कामासाठी लागणारे बिल्डींग मटेरियल ठेवलेले होते. दि. २२ च्या रात्री साडेनऊ ते दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ८,१२ आणि १५ एमएमच्या लोखंडी आसारीचे बंडल, असा एकूण दीड लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. उमेश पाटील हे करीत आहेत.