वरणगाव (प्रतिनिधी) शहरातील सिध्देश्वर नगर भागात घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञातांनी सोमवारी रात्री पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली असून या घटनेबाबत पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शहराच्या सिध्देश्वर नगर भागात भुरटे चोरट्यांकडून चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. सोमवारी रात्री याच भागातील रहीवाशी शेख अकरम शेख अकील यांची (एम.एच.१९ डि. ८२५१) क्रमांकाची दुचाकी घरासमोर लावलेली असतांना, रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पेटवुन दिली. शेख यांनी दुचाकीला विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पर्यंत दचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय भरत चौधरी यांच्या मागदर्शनाखाली पोहेकॉ नागेंद्र तायडे तपास करीत आहेत.