जळगाव(प्रतिनिधी) शेतक-यांची बांधावरील चोरी केलेली दुचाकी चोरट्याला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खोटे नगरातून ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शेतक-यांची बांधावरील दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना गुप्त माहितीनुसार त्यांनी सपोनि जालींदर पळे, पोहेकॉ जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, पोना नितीन बाविस्कर, पोना अविनाश देवरे यांचे पथक पाठवीत संशयित आरोपी ईश्वर जगन्नाथ सपकाळे रा. धामणगांव याला चोरीच्या दुचाकी सोबत ताब्यात घेतले असून त्याने गुन्हाची कबुली दिली आहे.