चाळीसगाव (प्रतिनिधी) दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी वर्धमान धाडीवाल सारख्या व्यक्तींचे कार्य कौतुकास्पद असल्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील म्हणाले. तसेच दिव्यांग बांधवांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही त्यांनी दिले
दिव्यांग दिनाचे औचित्य साधत वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवाराच्यावतीने दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम अंधशाळा चाळीसगाव येथे संपन्न झाला. व्यासपीठावर चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे, के. के.पाटील (पोलीस निरीक्षक), नंदकुमार वाळेकर (गट विकास अधिकारी), वर्धमान भाऊ धाडीवाल (जनसेवक), मीनाक्षीताई निकम, कापडणीस (सहाय्यक पोलीस निरीक्षक), चौधरी (समाज कल्याण विभागाचे अधिकारी), अरुण बापू निकम (सचिव राष्ट्रीय शिक्षण संस्था), किसनराव जोर्वेकर (संपादक दैनिक सर्वांचा ग्रामस्थ), रमेश चव्हाण (माजी उपनगराध्यक्ष), नगरसेवक सुरेश स्वार, रामचंद जाधव, दीपक पाटील, सोमसिंग राजपूत, डॉ.अनुप पवार, डॉ. हरिष दवे, योगेश भोकरे, पवार गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथमतः सर्व मान्यवरांना वृक्षाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर तहसीलदार अमोल मोरे यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग बांधव तहसिल कचेरी मध्ये कामानिमित्त आले तर त्यांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल हे स्पष्ट केले. के.के. पाटील यांनी वर्धमान भाऊ धाडीवाल यांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा देत दिव्यांग बांधवांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले व अपंग विकास बहुउद्देशीय संस्थेला २१ हजार रुपयांचा मदत निधी दिला. नंदकुमार वाळेकर यांनी पातोंडा येथील गायकवाड कुटुंबीयांची एका महिन्याच्या आत जी मदत केली त्याबद्दल मीनाक्षीताई निकम यांनी त्यांचे सहृदय आभार मानलेत व त्यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिव्यांग सुविधा केंद्र उभारून शासकीय योजनेचे सर्व लाभ देण्याचे आश्वस्त केले.
किसनराव जोर्वेकर यांनी विविध शासकीय योजना लाभार्थीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी अधिकाऱ्यांना साद घालत लोकप्रतिनिधी यांनी पण दिव्यांग बांधवांसाठी पुढे आले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली. अरुण बापू निकम यांनी देव देव्हाऱ्यात नसून माणसात आहे आणि या युगात तो वर्धमान भाऊ यांच्या रूपाने दिसत आहे. असे गौरवोद्गार काढत सभेला संबोधित केले. सोमसिंग आबा राजपूत यांनी ११००० व रमेश आबा चव्हाण यांनी ११००० रुपये स्वयं दीप परिवाराला मदत स्वरूपात दिलेत. मीनाक्षी निकम यांच्या अपंग विकास बहुउद्देशीय संस्थेमार्फत वर्धमान भाऊ धाडीवाल यांना दिव्यांग मित्र गौरव सन्मान-२०२१ पुरस्कार देऊन सहकुटुंब मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले. तसेच समाज कल्याण विभाग जळगावच्या वतीने देखील वर्धमान भाऊ धाडीवाल यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर अपंग विकास बहुउद्देशीय संस्थेमार्फत गेल्या वर्षभरात दिव्यांग बांधवांना सहकार्य करणाऱ्या तालुक्यातील १० दिव्यांग मित्रांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधवांना २७ तीन चाकी सायकल, ४ व्हील चेअर, ८ कुबड्या, ७ अंध काठ्या तसेच विधवा महिला यांना ९ शिलाई मशीनचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वयंदीप परिवार सदस्य, वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र मंडळाचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी तर आभार दिलीप भाऊ घोरपडे यांनी मानलेत. कार्यक्रमाला शहरातील विविध संस्थेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.