मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरातील अंबिका ज्वेलर्स दुकानात अज्ञात चोरट्यांनी ३० लाखोंची चांदी चोरून नेल्याची माहिती सकाळी समोर आली होती. परंतू लाखोंची चांदी लॉकरमध्ये सुरक्षित असल्याचे तपासाअंती समोर आले आहे. तसेच दुकानातून अवघ्या काही हजाराच्या चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.
शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या अंबिका ज्वेलर्स अज्ञात चोरट्यांनी रात्री फोडले होते. सुरुवातील अंबिका ज्वेलर्सचे संचालक अनिल शूरपाटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ३० लाख रूपयांची चांदी चोरीला गेल्याचे म्हटले होते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी धाव घेत तपासाला सुरुवात केली. तेवढ्यात अंबिका ज्वेलर्सचे संचालक अनिल शूरपाटणे यांचे वडील देखील आहे. पोलीस निरीक्षक शेळके यांनी लॉकर उघडायला सांगितल्यानंतर लॉकरमध्ये चांदी सुरक्षित होती. शूरपाटणे यांच्या वडिलांनी देखील चांदी लॉकरमध्येच ठेवली असल्याचे सांगितले. त्यामुळे सकाळी गैरसमजातून ही चांदी चोरीला गेल्याची माहिती माध्यमांना देण्यात आली. त्यामुळे अवघ्या ५० ते ६० हजाराच्या दोन किलो वजनाच्या पायातील चांदीच्या काही साखळी चोरीला गेल्याचे फिर्यादीत उल्लेख असल्याचे कळते. तरीदेखील घटनास्थळी ठसेतज्ञ, श्वान पथक, विभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासाठी आले होते.