TheClearNews.Com
Monday, May 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आपत्कालीन सेवेने नऊ वर्षांत वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण !

१०८ सेवा अधिक जलद व तत्पर करावी, मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2023
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार ४२० नागरिकांचे प्राण वाचले आहेत‌. हृदयविकाराचे रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे. ५२ हजार ३७६ महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात हलविण्यात यश आले आहे .

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘१०८’ या आपत्कालीन रूग्णसेवेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला असून रूग्णांना जलद व तत्पर सेवा देण्याचे काम रूग्णवाहिकांनी करावे. या मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी‌. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, बीव्हीजी इंडिया कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.राहूल जैन, जिल्हा समन्वयक आतिष सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ‘१०८’ रूग्णवाहिकेच्या रूग्णसेवेची आकडेवारी सादर करण्यात आली.

READ ALSO

सुप्रीम कॉलनीत घराचा कडीकोयंडा कापून चोरट्यांची हातसफाई

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

रूग्णांना मिळाली संजीवनी !
जळगाव जिल्ह्यात 2014 पासून ते नोव्हेंबर 2023 पर्यंत अपघातग्रस्त 20 हजार 778 रूग्ण तसेच हाणामारीचे 4 हजार 476 रुग्णांना तर, 1 हजार 56 जळीत रूग्णांना, त्याच प्रमाणे छातीत दुखण्याचे 1 हजार 622 रुग्ण, उंचावरून पडणे 4 हजार 550 रुग्ण, विषबाधा झालेले 12 हजार 860 रुग्णांना, इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या 329 रुग्णांना, 795 मोठ्या अपघातातील रुग्णांना सेवा दिली आहे. 1 लाख 47 हजार 56 रूग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यात आली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 334 रूग्णांना सेवा मिळाली आहे. पॉली ट्रॉमातील 5 हजार 411 रूग्णांना मदत देण्यात आली.

रूग्णसेवेचा संख्येत वाढत होत आहे. 2023 या वर्षात मागील तीन मह‍िन्यापैकी सप्टेंबर मह‍िन्यात 2 हजार 134 रूग्ण, ऑक्टोंबर मध्ये 2 हजार 888 रूग्ण व नोव्हेंबर मध्ये 3 हजार 657 रूग्णांना आपत्कालीन सेवेचा लाभ देण्यात आला.
वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था व एनएचएम महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१०८’ रुग्णवाहिका सुरू केली असून आपातकालीन वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी ‘१०८’ रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळत आहे. असे डॉ. राहुल जैन यांनी सांगितले.

रुग्णवाहिका कशी उपलब्ध होते ?

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘१०८ रुग्णवाहिका’ सेवा ही तातडीच्या उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १०८ या मोफत मदत क्रमांकावर (टोल फ्री क्रमांकावर) संपर्क साधून ही रुग्णवाहिका मागवणे शक्य आहे. १०८ च्या सुसज्ज आणि अद्ययावत नियंत्रणकक्षाद्वारे नजीकच्या रुग्णवाहिकेला रुग्णापर्यंत पोहोचण्यास मदत केली जाते. त्यामुळे कमीत कमी वेळात प्राथमिक, तसेच अनेकदा अगदी तातडीचे उपचारही १०८ मध्ये उपलब्ध झाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सुप्रीम कॉलनीत घराचा कडीकोयंडा कापून चोरट्यांची हातसफाई

May 11, 2026
गुन्हे

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

May 11, 2026
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 10, 2026
गुन्हे

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

May 10, 2026
गुन्हे

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

May 10, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
Next Post

जळगावात 34 जणांवर धुम्रपान कायद्याने गुन्हे दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘सीबीआय’च्या छापेमारीनंतर अनिल देशमुखांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले…

April 24, 2021

ब्रेकिंग न्यूज : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक !

March 21, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ८ मार्च २०२३ !

March 8, 2023

बोदवड कृउबा समितीचे संचालक गोपाळ माळी यांनी स्वखर्चातून दिली गावात स्टील तिरडी !

August 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group