पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील पाळधी बायपास जवळील एमएसईबी जवळ शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रबोधन यात्रेसाठी उपस्थितीचे आवाहनचे लावलेले बॅनर चोरीला गेले आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे शहर प्रमुख भागवत चौधरी यांनी पाळधी पोलिसात तक्रारी अर्ज दिला आहे.
या संदर्भात ठाकरे गटाचे शहर प्रमुख भागवत चौधरी यांनी पाळधी पोलिसात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, पाळधी बायपास जवळील एमएसईबी जवळ शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या सत्काराचे बॅनर लावलेले होते. हे बॅनर ३० ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.