जळगाव (शिवराम पाटील) जेडीसीसी संचालक निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही. आर्थिक संस्था बिनविरोध होऊ लागल्या तर जेडीसीसीची अवस्था बीएचआर सारखी होईल, असे सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.
शिवराम पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी
जळगाव जिल्हा बँकेची संचालक मंडळाची निवडणूक जवळ आली आहे. आता शेतकरी, कामकरी, सोसायटी मतदारांनी जवळ यावे. विचार करावा. संचालक पदासाठी कोण योग्य, कोण अयोग्य?याचा विचार करावा. काहींनी अनुभव घेतला. काहींनी अभ्यास केला.त्याचा उहापोह करण्याची हिच वेळ आहे.जागृत राहाण्याची हिच वेळ आहे.कबीर सोते रह गया और चिडीया खेत चुभ गई, असे पुन्हा व्हायला नको.
जेडीसीसी संचालक निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही. आर्थिक संस्था बिनविरोध होऊ लागल्या तर त्यातील पैसा कोण कसा हजम करील, त्याची माहिती कोणालाही मिळणार नाही. मग आपण फक्त घरकुल, बीएचआर सारखे बातम्या वाचत राहू. पोलीस, कोर्ट खेळत राहू.
अब काहे क्यू रोये कबीरा,
जब चिडीया चूभ गई खेत.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,आपण जेडीसीसी म्हणतो. ही बँक जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी, संस्थांचे नोकरांसाठी जास्त व्यवहाराची आहे.सर्वच लहान मोठ्या सोसायट्या,ग्रामपंचायती,निमसरकारी संस्थाचे नोकरांचे पगार यात आहेत.आणि हिच बँक जर फक्त आडू माडू साडू अशा ठराविक लोकांची बटिक बनली तर शेतकऱ्यांना कोणी उभे करणार नाही. चार पांच पक्षांच्या निवडक माणसांची त्यावर सतत कमांड राहिली तर साखर कारखाने, खान्देश मील,दूधफेडरेशन, महानगरपालिका,बीएचआर सारखी तिची अवस्था होईल.
जळगाव जिल्ह्यातील जे आमदार ज्यांना तुम्ही नेते समजतात त्यांचा अनुभव लक्षात घेतला पाहिजे. जिल्ह्यातील साखर कारखाने का बंद पडले? उस महागला का? साखर स्वस्त झाली का?नोकर पळून गेले का? असे काहीच झाले नाही. तर या चेयरमन व संचालकांनी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून विल्हेवाट लावली.जर सहकारी साखर कारखाना किंवा सुतगिरणी तोट्यात गेली तर खाजगी साखर कारखाना व खाजगी सुतगिरणी तोट्यात का गेली नाही? याचा अभ्यास नंदुरबार, शहादा,शिरपूर,चोपडा,एरंडोल,मुक्ताईनगर रावेर येथून केला पाहिजे.सातारा कोल्हापूर,सांगली आणि पुणे बारामती परळी चा ही तोच अभ्यास आहे. सहकारी कारखाने बरबाद करून तेच चेयरमन ,संचालक खाजगी कारखान्याचे मालक बनलेच कसे? हे शेतकऱ्यांच्या लक्षात आले नाही. शेतकरी नेत्यांनी त्यांना सांगितले नाही. शिवाय राजू शेट्टी.
जळगाव जिल्ह्यात दूध फेडरेशन भरभराटीस आले होते.बाजारभाव पेक्षा स्वस्त दूध घेत होते.म्हणजे फेडरेशन ला नफा जास्त.तरीही दूध फेडरेशनचे मख्खन चाटून फक्त ताक बाकी ठेवलेले आहे.ही करामत करणारे आमदार झाले. खासदार झाले. आणि तेच करामती आता जेडीसीसी मधे संचालक बनत आहेत.वरून पेपरला बातमी अमुक अमुक काकासाहेबांनी दूध फेडरेशन मधे चेयरमन पदाची धुरा सांभाळली.अमुक अमुक ताईसाहेबांनी दूधफेडरेशन ची जबाबदारी सांभाळली. अहो,धुरा नाही सांभाळली,अक्षरशः धुवून काढले.याची माहिती तेथील निवृत्त आधिकारी जळगाव चे श्री एन जे पाटील देतील.
जळगाव जिल्हा बँकेतील करामती यापेक्षा भयानक आहेत.संचालकांनी ५०/६०कोटी एकाच वेळेस उचलले.त्यावर सहकारी साखर कारखाना विकत घेतला. कोणी पुण्यात जमीन घेतली.कोणी हायवे प्रस्तावित जळगांव लगत जमीन घेतली. कोणी इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज काढली. हे चुकीचे नाही काय दुसरीकडे धानवडच्या शेतकरी हरीसींग राठोड ला कर्ज दिले तर चार वर्षे साधे पासबुक भरून दिले नाही.कर्ज दिले किती,वसुल केले किती?याचे लोन स्टेटमेंट दिले नाही. सांगा, तो शेतकरी कर्जमाफी अर्ज करील कसा ?
जळगाव तालुक्यातील आमोदे बु.येथील शेतकरी शामकांत विनायक सुर्यवंशी याचे कर्जमाफी चा अर्ज यावल तालुक्यात जोडला. चुकीचा तालुका कम्प्युटर मधे सचिव ने भरला म्हणून कर्जमाफी मिळाली नाही. त्याने कर्जबाजारीच्या दडपणाखाली आत्महत्या केली.मी स्वतः जेडीसीसी चे एमडी जितेंद्र देशमुख, चेयरपर्सन रोहिणी खडसे,संचालक एकनाथ खडसे,गुलाबराव पाटील ,गुलाबराव देवकर,चिमणराव पाटील यांचेकडे विषय समजावून दिला.सर्वांनी कानाडोळा केला.सांगा काय उपयोग यांचा,शेतकऱ्यांचे नेते बनण्याचा? का म्हणून शेतकऱ्यांनी किंवा सोसायटी सदस्यांनी मतदान करावे?काय अपेक्षा ठेवावी,यांचेकडून?तर मग,पुन्हा निवडून द्यावे का?हा विचार आम्ही केला.आता तुम्ही करा.
संचालक आणि चेयरमन हे बँकेचे विश्वस्त असतात. म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा त्यांचेवर.त्यांनी विश्वास राखून प्रामाणिकपणे काम करावे.त्यांनी स्वतः कर्ज घेऊ नये.संचालक पद म्हणजे नोकरी नाही.मानाचे पद आहे. सेवा आहे.कारण ते परीक्षा देऊन मिळाले नाही. आम्ही विश्वास टाकून , मत देऊन सोपवले आहे.बँकेची तिजोरी सांभाळा.पण जर यांनीच तिजोरीत हात घालून मोठी रक्कम कर्जरुपाने कि असेना पण उचलली.हे चुकीचे नाही काय? याचा विचार आम्ही केला.आता तुम्ही करा.
एरवी एकमेकांची तोंडे लाल करणारी माणसे,एकमेकांना जेलमधे पाठवणारी माणसे,एकमेकांची सीडी बनवणारी माणसे आता बंद दरवाजा आड खलबते करीत आहेत.एकमेकांचे गालगुच्चे घेत आहेत.आता यांना दाढीवरचे खुंट टुचत नसतील का?विचारा त्यांना. पुन्हा बेत आखला जात आहे, जेडीसीसी कब्जात ठेवण्याचा. शेतकऱ्यांच्या,नोकराच्या धनावर नागोबा बनण्याचा.या नागोजीरावांना आता तिजोरीवरुन खाली उतरवायची वेळ आली आहे. आम्ही विचार केला.आता तुम्ही विचार करा.उठा.लढा.बिनविरोध होऊ देऊ नका.बिनविरोध झाली तर लोकशाही संपते.भीती संपते.इमानदारी संपते. मग तुमचा हक्क संपतो.तो संपू द्यायचा का?आम्ही विचार केला आहे.आता तुम्ही करा.कागदपत्रे तयार करा.उमेदवारी अर्ज भरा.लढा.आम्ही आहोत सोबत.जळगाव जिल्हा जागृत जनमंच.
….शिवराम पाटील.
9270963122
महाराष्ट्र जागृत जनमंच.