नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अनेक देशांमध्ये वेगवेगळे माहित नसलेले प्राणी राहतात. पण आपल्याला त्याची देखील नसते, असाच एक प्राणी भारतीय जंगलांमध्ये पहायला मिळाला आहे. त्या प्राण्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. फोटोला पोस्ट करून त्यांनी सोशलमीडिया युजर्सला म्हटलं आहे की, ओडीसाच्या जंगलांतील या प्राण्याला ओळखा?.
फोटो पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावून जाल. फोटोतील प्राणी ना बिबट्या आहे ना मांजर. परंतु या दोघांशी मिळता जूळता हा प्राणी भारतीय जंगलात सापडला आहे. वन अधिकारी सुशांत यांनी ट्वीट करून माहिती दिली की, ही एक Lepard Cat आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम अनुसार अनुसूची (I)मधील प्राण्यांप्रमाणे याचा काही लोकांनी अचुक अंदाज लावला आहे. ओडिसातील मयूरभंज जिल्ह्यात कॅमेऱ्या कैद झालेल्या या प्राण्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.