यावल (प्रतिनिधी) येथील जुन्या अट्रावल मार्गावरील एका मळयात बिबट्या दिसल्याने परिसरात शेतकऱ्यांची एकच धावपळ झाल्याचे वृत्त हाती आले आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की दिनांक २ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास यावल भुसावळ मार्गावरील कानतोडी नाल्याच्या काठावर जुना अट्रावल मार्गावरील पट्टेदार बिबट्या वावरतांना आढळून आला.
भुसावळ मार्गावरील कानतोडी नाल्याच्या काठावर जुना अट्रावल मार्गावरील शांताबाई नेमाडे यांच्या नवतीच्या मळ्यात हरभऱ्याला पाणी देत असतांना शेती करणारे जितेन्द्र देशमुख यांना शेतात पट्टेदार बिबट्या वावरतांना दिसला. जितेन्द्र देशमुख यांनी तात्काळ भुसावळ मार्गावरील महाराष्ट्र गुजरात हॉटेलचे संचालक कदीर खान यांना दुरध्वनीवरून संपर्क साधुन सुरक्षित मळयातुन बाहेर काढण्याची विंनती केली. त्यावेळी कदीर खान यांनी आपले मित्र शेरखान व जुल्फेकार खान, जाबीर खान, यांनी तात्काळ चारचाकी वाहनाने मळयात धाव घेत जितेंद्र देशमुख यांना आपल्या गाडी बसवुन सुरक्षात बाहेर काढले असुन , त्यांनी मिळेल त्या पद्धतीने त्या मळया जवळच्या शेतात काम करणाऱ्या लोकांना माहीती देवुन सावधान केले आहे. या परिसरातील शेतातील विद्युत पुरवठ्याचे रात्रीचे भारनियन असल्याने शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.