TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही, हे तर ‘संधीसाधू’ सरकार : गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वाढीव वीज बिले, ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न तसेच इतर कारणांमुळे महावितरण कंपनीच्या विरोधात आज भाजपने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे एकमत नाही. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही. हे सरकार संधीसाधू आहे. असे भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन म्हणालेत.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वात महावितरण कंपनी विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनप्रसंगी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर गिरीश महाजन यांनी सडकून टीका केली. यावेळी ते बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे एकमत नाही. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही. हे सरकार संधीसाधू आहे. खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना सर्वसामान्य जनतेशी देणेघेणे नाही. आज राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. सत्तेत येण्यापूर्वी यांनी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. परंतु, सरकारची आश्वासने हवेत विरली आहेत, अशा शब्दात भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महाआघाडी सरकारवर टीकास्त्र डागले.

READ ALSO

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

महाविकास आघाडीचे आंदोलन म्हणजे, अपयश लपवण्याचा प्रयत्न

यावेळी बोलताना माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी ते केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चे काढत आहेत, आंदोलन करत आहेत. राज्याच्या सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक घोषणा दिल्या होत्या. परंतु शेतकऱ्यांना अडचणीत मदत मिळाली नाही. सरकारच्या सर्व घोषणा फसव्या ठरल्या. सरकारने सातबारा उतारा कोरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्या बाबतीत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झाली नाही. शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळाले नाही. राज्यातील शेतकरी संकटात असताना या सरकारने कानावर हात ठेवले, असा आरोपही गिरीश महाजन यांनी यावेळी केला.

यावेळी जामनेर शहरातील नगरपालिका चौकापासून महावितरण कंपनीच्या कार्यालयावर भाजपच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुकाभरातील शेतकऱ्यांसह भाजपचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. हा मोर्चा महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकल्यानंतर त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार तसेच महावितरण कंपनीच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर कार्यालयाला टाळं ठोकत आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलेली वाढीव वीज बिले रद्द करावीत, शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करावा, ट्रान्सफार्मर त्वरित बदलून मिळावेत, अशा प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन यापुढे छेडण्याचा इशारा भाजपच्या वतीने यावेळी देण्यात आला.

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवली आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. घरेदारे विकली तरीदेखील ही बिले शेतकरी भरू शकणार नाही. अशी परिस्थिती आहे. परंतु तरीदेखील सरकार पुढाकार घ्यायला तयार नाही. आज रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. ट्रांसफार्मर जळाला तर तो बदलून मिळत नाही. एकंदरीतच सरकारचे उदासीन धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. राज्यात कुणीही कुणाचे ऐकून घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती असल्याची टीकाही गिरीश महाजन यांनी यावेळी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित, ५२ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देश हादरला ! पती आणि मुलांच्या डोळ्यांदेखत महिलेवर सामूहिक बलात्कार

March 20, 2022

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित !

December 20, 2021

शिर्डी साई संस्थानाने लावलेला ड्रेसकोड सक्तीचा फलक काढणारच : तृप्ती देसाई

December 10, 2020

पुणे-नाशिक महामार्गावर ‘द बर्निंग टेम्पो’चा थरार’ ; पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जळून खाक

February 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group