जळगाव (प्रतिनिधी) रात्रीच्या वेळी बंद असलेल्या किराणा दुकानाचे शटर उचकवून चोरट्याने रोख १२ हजार रुपये चोरून नेले. ही घटना १२ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संतोषी माता नगरात घडली. या प्रकरणी मोबीन खान युसुफ खान (वय २५, रा. नशेमन कॉलनी) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे.
शहरातील संतोषी माता नगरमध्ये शेख आलम अब्दुल रऊफ (वय ४२, रा. मास्टर कॉलनी) यांची किराणा दुकान आहे. दि. १२ जुलै रोजी रात्री त्यांनी दुकान बंद केल्यानंतर चोरट्याने दुकानाचे शटर उचकवून टेबलच्या ड्रावरमधून नोटा, चिल्लर असे एकूण १२ हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी शेख आलम यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मोबीन खान युसूफ खान याला अटक करण्यात आले. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.