मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरातील एका अंगणवाडीतून चोरट्यांनी ३ हजार रुपयाचा मुलांना आणि गरोदर महिलांना
देण्यात येणारा कच्चा आहाराची चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुने गावातील अंगणवाडी क्रमाक १८ मधील दि ८ रोजी दुपारी १ ते ९ रोजीच्या सकाळी ९ वाजेच्या सुमारास अंगणवाडीच्या खोलीचा दरवाजाच्या कडीकोयडा तोडून लहान मुलं व गरोदर महिलांना वाटप विना शुल्क वाटप करण्यात येणारा कच्चा आहार कुणी तरी चोरट्यांनी चोरला आहे. त्यामध्ये गहूचे १० पाकीट १ हजार रुपयाचा, हरभऱ्यांचे १० पाकीट ५०० रुपयांचा, साखरेचे ५ पाकीट २०० रुपयाचे, मिठाचे ५ पाकीट १०० रुपयाचे, मिरची पावडर ५ पाकीट १०० रुपयाचे याच्यासह स्टीलची भांडी, असा माल लांबविला आहे. याप्रकरणी सुनिता विठ्ठल माळी (वय ५२) व्यवसाय अंगणवाडी सेविका (रा.इदगाह नगर, मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसात अज्ञात व्यक्तीवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.विनोद सोनवणे हे करीत आहेत.