जळगाव (प्रतिनिधी) कार्यक्रमाहून परतत असतांना घराजवळच मोपेड दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी अनिता अरुण ढाके (वय ४८, रा. अयोध्यानगर) यांच्या गळ्यातून ८ ग्रॅमची पोत आणि १० ग्रॅमची सोन्याची चैन जबरीने ओढून चोरुन नेली. ही घटना दि. १६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अयोध्या नगरातील संजीवनी अपार्टमेंटजवळ घडली. याप्रकरणी एमआडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अयोध्या नगरात अनिता अरुण ढाके या महिला वास्तव्यास आहे दि १६ रोजी सकाळी त्या काशीबाई कोल्हे येथे गेट टू गेदरच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून त्या दुपारी चार वाजता त्यांची अयोध्या नगरात राहणारी मैत्रीण सुनिता नेहते यांच्यासोबत दुचाकीने पूनम भोळे यांच्या घरी गेल्या. तेथून दुचाकीची चावी घेवून त्या अयोध्या नगरातील घरी जाण्यासाठी निघाल्या.
पायी येत जबरीने ओढून चोरटे पसार
घराजवळील संजीवनी अपार्टमेंटजवळ पोहचल्यानंतर गाडीवरुन उतरत असतांना मोपेड दुचाकीवरुन डोन इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने गाडी काही अंतरावर थांबवली तर दुसरा हा त्यांच्याकडे पायी आला. त्या संशतियाने अनिता ढाके या महिलेच्या गळ्यातील ४० हजारांची ८ ग्रॅमची पोत आणि ५० हजारांची १० ग्रॅमची सोन्याची चैन जबरीने चोरुन नेली.
आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार
ओढून तो चोरटा काही अंतरावर उभ्या असलेल्या गळ्यातून सोन्याची पोत आणि चैन जबरीने दुचाकीवरुन पसार झाला. महिलेने आरडाओरड केली मात्र तो पर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते. याप्रकरणी अनिता ढाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















