जळगाव (प्रतिनिधी) बांधकामासाठी लागणाऱ्या आसाऱ्या, लोखंडी प्लेट व इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना दि. ४ जुलै रोजी शहरातील महाबळ व आदर्श नगरात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील महाबळ परिसर व आदर्श नगरमध्ये मक्तेदार किरण जगन्नाथ पवार (वय ३५, रा. समतानगर) यांचे बांधकाम सुरू आहे. यासाठी सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेट, लोखंडी जॅक, आसाऱ्या व इतर बांधकाम साहित्य ठेवले होते. दि. १० जून ते दि. ४ जुलै या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी हे – साहित्य चोरून नेले. साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात – आल्यानंतर किरण पवार यांनी परिसरात शोध घेतला. – मात्र त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. याविषयी – त्यांनी दि. १० ऑगस्ट रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विनोद सूर्यवंशी करीत आहेत