TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशनला निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल प्लेक्स कौन्सिलची तेरा पारितोषिके

ड्रीप इरिगेशन, पाईप्स, पीव्हीसी फोमशीट व क्षेत्रातल्या निर्यात कार्याबाबत झाला गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध 13 गटातून प्लेक्स कौन्सिलचे प्रथम क्रमांकाचे निर्यात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मुंबईच्या कफ परेड येथील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे प्लेक्स कौन्सिलचे 2017-18, 2018-19, 2019-20 व 2020-21 अशा चार आर्थिक वर्षातील 12 प्रथम पुरस्कार व एक द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी कंपनीच्या ड्रीप इरिगेशन विभागाच्या उत्तुंग कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार स्वीकारला. त्याचप्रमाणे कंपनीच्यावतीने त्या-त्या विभागासाठीचे पुरस्कारदेखील कंपनीच्या सहकाऱ्यांनी स्वीकारले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते, प्लेक्स कौन्सिलचे चेअरमन अरविंद गोयंका, व्हाईस चेअरमन हेमंत मिनोचा, कार्यकारी संचालक श्रीभाष दासमोहपात्रा, रविश कामत, मुंबई विभाग आयकर आयुक्त आलोककुमार या मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारोह पार पडला.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

कृषी व कृषी उत्पादनांच्या क्षेत्रात जागतिक किर्तीची अग्रणी कंपनी जैन इरिगेशनने प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीत उच्चांक राखत 2017-21 या वर्षासाठी ठिबक सिंचन (एमआयएस), पीव्हीसी फोम शीट, पाईप्स अॅण्ड होजेस विभागांना पहिल्या क्रमांकाची पारितोषिके देण्यात आली. 2019-20 या वर्षासाठी पाईप्स अॅण्ड होज फिटींगया विभागाला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिले गेले. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील कंपनीने उत्पादन व निर्यातीत वर्चस्व कायम ठेवत सर्वोत्तम कामगिरी केली हे या पुरस्कारासासाठी अधोरेखित झाले. कंपनीच्या वतीने चारही वर्षांच्या या एकूण 13 पुरस्कारांचा स्वीकार सहकाऱ्यांनी केला. त्यामध्ये पी. सेनगोट्टीयन, मनिष झेंडे, अजय काळे, संदीप जैन, प्रसाद दुर्गे, विजयसिंग पाटील, प्रवीण कुमट, नितीन चौधरी, संदीप पाटील, राजेंद्र लोढा, महेश इंगळे, प्रशांत जयस्वाल आणि भरत बडगुजर या सहकाऱ्यांचा समावेश आहे.

प्लेक्स कौन्सिल ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग विभागाद्वारे 1955 मध्ये स्थापन केलेली संस्था आहे. भारतातील प्लास्टिकमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील निर्यातीत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योगांना प्लेक्स कौन्सिल पुरस्कार देते. मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. चा प्लास्टीक उत्पादनांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यातीबद्दल प्लेक्स कौन्सिलतर्फे 1991 पासून दरवर्षी सन्मान होत आला आहे.

गुणवत्तेच्या जोरावरच आपण स्पर्धेला पात्र ठरू शकतो – अशोक जैन

कंपनीचे संस्थापक अध्यक्ष कै. भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीचा हा परिपाक होय, ते म्हणत असत की, “गुणवत्तेच्या जोरावरच आपण स्पर्धेला पात्र ठरू शकतो; किंबहुना स्पर्धकांना मागे टाकू शकतो. तसेच चोखंदळ ग्राहक व बाजारपेठ आपणास जागतिक कीर्ती मिळवून देऊन अग्रस्थानी बसवू शकते.” उत्तम, उदात्त, गुणवत्तेचा ध्यास घेत भविष्यात अनेक दर्जेदार वस्तु, शेतीत प्लास्टिकल्चर कशा वापरता येईल याकडे लक्ष दिले. जैन इरिगेशनला 1991 पासून ही पारितोषिके प्राप्त होत आहेत. कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, त्यांच्या कष्टाचा, समर्पण भावनेचा हा सन्मान आहे असे मी मानतो.”
– अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

सर्व काही सदावर्तेंनी केलं, आमचा काही रोल नाही ; दोन आरोपींनी दिली कबुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापालिकेत भाजपचीच सत्ता, फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल : गिरीश महाजन

March 15, 2021

जलआक्रोश मोर्चा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी होता की पाण्याचे राजकारण करण्यासाठी होता? ; शिवसेनेचा सवाल

May 24, 2022

पाच हजारांची लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगेहात अटक !

August 1, 2023

मोठी बातमी : तपास यंत्रणांच्या नावाने वसुलीप्रकरणी चौकशी ; वळसे -पाटलांची घोषणा

March 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group