चाळीसगाव (प्रतिनिधी) . ही निवडणूक नात्यागोत्याची किंवा परिवारवादाची नसून ही निवडणूक मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे. काही लोकं निवडणुकीला जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले. ते उंबरखेड येथे उंबरखेड येथे स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत बोलत होते.
आमदार मंगेशदादा चव्हाण पुढे म्हणाले की, उंबरखेड ही स्व.रामराव जिभाऊंची कर्मभूमी आहे. उंबरखेड ही स्वाभिमानाची भूमी आहे. चाळीसगाव तालुक्यातील सिंचन, शिक्षण आदी क्षेत्रात त्यांनी केलेले काम आमच्यासाठी आदर्श आहेत. उंबरखेड ही स्व.रामराव जिभाऊंची कर्मभूमी आहे. उंबरखेड ही स्वाभिमानाची भूमी आहे. चाळीसगाव तालुक्यातील सिंचन, शिक्षण आदी क्षेत्रात त्यांनी केलेले काम आमच्यासाठी आदर्श आहे. मात्र स्व. जीभाऊंच्या नावाने, बेलगंगेच्या नावाने मते मागितली, आमदार खासदार झाले मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी स्व.जीभाऊंच्या विचारांना तिलांजली देत आपला राजकीय स्वार्थ साधला. मात्र आता हीच प्रवृत्ती पुन्हा जनतेची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या नावाने तालुक्यात मत मागत आहेत. मात्र, आता अश्या प्रवृत्तीला धडा शिकविण्याची एक संधी या निवडणूकीच्या निमित्ताने मिळाली आहे.
तसेच ही निवडणूक नात्यागोत्याची किंवा परिवारवादाची नसून ही निवडणूक मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे. काही लोकं निवडणुकीला जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन याप्रसंगी केले. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले. ते हायकोर्टामध्ये टिकले, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द झाले. आता सरकारने दिलेले आरक्षण निश्चितच न्यायालयात टिकेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी महायुतीचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला येण्यास उशीर होऊनदेखील मोठ्या संख्येने उंबरखेडचे ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.