मुंबई (वृत्तसंस्था) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही. तसेच अजित पवारांशी संबंधित कुठल्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही, तसेच त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या पत्राला कायदेशीर उत्तर देणार असल्याचंही अजित पवारांच्या वकिलांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुस-या मंत्र्याला आयकर विभागाने मोठा झटका दिला होता. मंगळवार उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागाने नोटीस पाठवली. अजित पवारांच्या नातेवाईकांशी संबंधित कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली. कारवाई केलेली संपत्ती ही बेकायदेशीर नाही हे ९० दिवसांत सिद्ध करा असं आयकरकडून सांगण्यात आलं होतं. तोपर्यंत ही संपत्तीची विक्रीही करू शकत नाही असा आदेश आयकरकडून देण्यात आला आहे.
आतापर्यंत ‘या’ मालमत्तांवर कारवाई झाली
नवी दिल्लीतील २० कोटींचा फ्लॅट
निर्मल हाऊस पार्थ पवार ऑफिसची किंमत २५ कोटी
जरंडेश्वर शुगर फॅक्टरी जवळपास ६०० कोटी
गोव्यातील रिसॉर्ट जवळपास २५० कोटी
महाराष्ट्रातील २७ वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी जवळपास ५०० कोटी