नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २०२१ या वर्षानं कोरोना महामारी, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या घातक गोष्टी आपल्याला दिल्या. आता येणारं २०२२ हे वर्ष काय घेऊन येणार आहे, याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर बल्गेरियातील (Bulgaria) बाबा वंगा (Baba Vanga) यांनी २०२२ बद्दल केलेली आश्चर्यकारक भविष्यवाणी (Prophecy) चर्चेत आली आहे. २०२२ मध्ये भारताला स्तुनामी आणि एलियन्स यांचा सामना करावा लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.
बल्गेरियात राहाणारे वांगेलिया पांडावा गुस्तेरोव्हा हे एक दृष्टीहिन भविषवेत्ते आहेत. ते जगभरात बाबा वंगा या नावाने ओळखले जातात. त्यांनी केलेल्या भविष्यवाणी खऱ्या ठरतात असा समज आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक भविष्यवाणी केल्या आहेत. यापैकी सोव्हिएत संघाचं विघटन, ब्रिटनची प्रिन्सेस डायना हिचा मृत्यू, २००१ मधील वर्ल्ड ट्रेड सेंटर दहशतवादी हल्ला, चर्नोबिल अपघात आणि ब्रेक्झिट या संकटांबाबत केलेल्या भविष्यवाणी एकदम खऱ्या ठरल्या. परिणामी त्यांनी भारतातबाबत केलेलं वक्तव्य सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
“भारतातील तापमान ५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल. यामुळे पिकांवर टोळधाड येईल आणि भारतात दुष्काळ पडेल. २०२२ मध्ये भूकंप आणि त्सुनामीचा धोका वाढणार आहे. हिंद महासागरात एक शक्तिशाली भूकंप होईल आणि त्यानंतर मोठी त्सुनामी येईल. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया आणि भारतासह जगातील अनेक देशांच्या किनारी भागांना याचा सामना करावा लागेल. या त्सुनामीत शेकडो लोकांचा मृत्यू होईल. याशिवाय, २०२२ मध्ये एलियन्स ओमुआमुआ नावाचा लघुग्रह पृथ्वीवर पाठवतील.” असे अनेक चकित करणारे दावे त्यांनी केले आहेत. जर त्यांनी केलेल्या या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या तर येणारे २०२० हे वर्ष देखील संकटांनी भरलेलं असण्याची शक्यता आहे.