मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल रात्री उशिरा न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. राणे यांच्या सुटकेनंतर आमदार नितेश राणे यांनी शिवसेनाला इशारा दिला आहे. नितेश राणेंनी मनोज वाजपेयीच्या एका चित्रपटातील व्हिडीओ शेअर करत एक ट्वीट केलं आहे. आसमान में थुंकने वालों… करारा जवाब मिलेगा, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नितेश राणेंचं ट्विट
राजनीती या चित्रपटातील अभिनेते मनोज वाजपेयी हे एक भाषण करतानाच्या प्रसंगाचा तेवीस सेकंदांचा व्हिडिओ नितेश राणेंनी ट्विट केला आहे. एका सभेला संबोधित करत असलेले मनोज वाजपेयी अतिशय त्वेषाने भाषण करत असल्याचे यात दिसते. “मगर आसमाँ में थूँकनेवाले को शायद ये पता नहीं है… की पलट के थूँक उन्हीं के चेहरे पे गिरेगी… करारा जवाब मिलेगा… करारा जवाब मिलेगा…” असा डायलॉग मनोज वाजपेयी या व्हिडिओत बोलताना दिसतात.