भुसावळ (प्रतिनिधी) शहरात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. ४८ तासात शहरात व ग्रामीण भागात तब्बल तीन घरफोडी झालेlल्लीया आहेत. भुसावळात गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असून शनिवार रोजी पहाटे पुन्हा शहराला लागून असलेला खडका गाव या परिसरात घरफोडीची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की भुसावळ तालुक्यातील खडका गाव मुस्लिम कॉलनी परिसरातील पाणी टाकी जवळ असलेले शेख इस्माईल शेख हुसेन ट्रक ड्रायव्हर यांच्या घरात मध्यरात्री बंद घराच्या फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी करत अंदाजे दीड लाख कॅश व सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. शेख इस्माईल शेख हुसेन हे ड्रायव्हर कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्यांच्या परिवारातील त्यांची पत्नी मुलगा व सून हे भुसावळ शहरात मुलाकडे ये जा करत होते. तसेच परिवारातील सदस्य हे नेहमी दररोज रात्री घरात झोपत होते शुक्रवारच्या रात्रीच फक्त भुसावळ शहरात त्यांच्या मुलाकडे शुक्रवारी रात्री राहिले होते. याचा गैरफायदा चोरट्यांनी उचले. रात्र अंधाराचा फायदा उचलत चोरट्यांनी शेख इस्माईल यांच्या घराच्या कंपाऊंड दिवार उडी मारून घराच्या मागची गल्लीतून असलेला प्रवेश द्वारच्या वरती एक साठी सोडलेल्या गाड्यातून लहान मुलांना प्रवेश करून आतील दरवाजाचा कडी उघडण्यात आली असेल असं अंदाज पोलिस सूत्रांनी लावलेले आहेत. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेख इस्माईल शेख हुसेन यांचे परिवारातील सदस्य हे घरी आले. घरात मुख्य प्रवेशद्वारात आतमध्ये प्रवेश केला. तसेच घरातील सामग्री अस्ताव्यस्त अवस्थेत दिसल्याने चोरी झाली असे निदर्शनात आल्याने बाजारपेठ पोलिस स्थानकात कळविण्यात आले.
शेख इस्माईल शेख हुसेन यांच्या घरातील हॉलमधील एलईडी ३२ इंच असलेली टीव्ही, बेडरूममधील कपाटातील तिजोरी व कपडे सामान अस्ताव्यस्त करून अंदाजे रोख रक्कम ९७ हजार एका कपाटात नऊ हजार तर दुसऱ्या कपाटात गटातील पैसे असलेले रोख रक्कम ७००० हजार रोग व तसेच सोन्याची मंगळसूत्र चांदीचे दोन अंगठी असेच चोरट्यांनी अंदाजे एकूण रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने सहित १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल वर हात सफा केला. चोरी झालेल्या शेख इस्माईल यांचे घर हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने चोरट्यांनी घरफोडी केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या लग्नसराईच्या वेळ सुरू असल्याने चोरट्यांनी याचा फायदा घेत बंद घरा वर डला मारला आहे. तब्बल ४८ तासात शहरात व ग्रामीण भागात तीन घरफोडी झालेली आहे.
घटनास्थळी रात्रीच्या नऊ वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलिस स्थानकातील प्रभारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोटले, कृष्णा भोई, पोलीस कर्मचारी रवी बिऱ्हाडे, रमण सुरळकर आदी आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.
















