TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद नगरपरिषदेसाठी पाच कोटींचा निधीला मान्यता

शहराच्या कायापालटास प्रारंभ ; पालकमंत्र्यांचा पाठपुरावा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने नगरपरिषदांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय्य या योजनेच्या माध्यमातून नशिराबाद नगरपरिषदेसाठी पाच कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून याबाबतचा शासन निर्णय नगरविकास खात्याने जाहीर केला आहे. यातील चार कोटी रूपयांमधून नगरपरिषदेची अद्ययावत प्रशासकीय इमारात उभारण्यात येणार असून एक कोटी रूपयांचा निधी स्मशानभूमिसाठी प्रदान करण्यात आला आहे. या माध्यमातून ना. गुलाबराव पाटील यांनी आधी दिलेल्या आश्‍वासनानुसार निवडणुकीच्या आधीच नशिराबादकरांना विकासकामांसाठी निधीची भेट दिली आहे. या माध्यमातून नशिराबादचा कायापालट होण्यास प्रारंभ झाल्याचे दिसून येत आहे.

याबाबत वृत्त असे की, नशिराबाद येथील ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपरिषद स्थापन करण्यात आली असून जिल्हातील अन्य नगरपालिकांच्या सोबत येथे निवडणूक होणार आहे. दरम्यान, नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शहराच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. या अनुषंगाने नशिराबाद येथे अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय, रस्ते आणि गटारींसाठी निधी प्रदान करण्यात येत असून गेल्या आठवड्यातच नशिराबाद ते सुनसगाव या रस्त्याचे विस्तारीकरण आणि डांबरीकरणास प्रारंभ करण्यात आलेला आहे.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

या पार्श्‍वभूमिवर, आज नशिराबाद नगरपंचायतीला पाच कोटी रूपयांचा निधी प्रदान करण्यात आलेला आहे. नगरविकास खात्यातर्फे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषदांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय्य या योजनेच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा जीआर अर्थात शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. या पाच कोटी रूपयांपैकी चार कोटी रूपयांमध्ये नगरपंचायतीसाठी अद्ययावत प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार असून एक कोटी रूपयात नशिराबादकरांसाठी स्मशानभूमि उभारण्यात येणार आहे.

या संदर्भात बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, नशिराबादचा कायापालट करण्याचे जाहीर अभिवचन आपण येथील नागरिकांना दिले असून या अनुषंगाने शहरातील विकासकामांचा प्रचंड गती प्रदान करण्यात आली आहे. लवकरच निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदेसाठी अद्ययावत इमारत असावी असा विचार आपण आधीच मांडला असून याची पूर्तता झाली आहे. तर नशिराबादकरांनी सर्व सुविधांनी युक्त असणार्‍या स्मशानभूमिची मागणी देखील कधीपासूनच करण्यात येत होती. हे काम देखील आता मार्गी लागणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांचे अनमोल सहकार्य लाभल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

सदर निधी मंजुरीचे वृत्त नशिराबाद येथे वाऱ्यासारखी पसरले असता शिवसेना, युवा सेना व महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फटाके फोडून आनंद व जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, चंदु भोळे, विकास पाटील, यूवासेना शहरप्रमुख चेतन बर्‍हाटे, आप्पा धर्माधिकारी, आबा माळी, महेंद्र कोळी, कैलास नेरकर, बंडु रत्न पारखे, नितीन बेंडवाल, बापु चौधरी, सुनिल महाजन, मोहन कोलते, मनोज देशमुख, दिनेश माळि, सोहन पाटील, सतिश रोटे, भुषण कोल्हे, हरीष येवले, पांडु बाविस्कर, मयुर देवरे, शुभम सोनार, आबा सोनार, निलेश धनगर, विशाल सोनवणे आदी उपस्थित होते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
जळगाव

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

नशिराबाद येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना कार्यालयात अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा : सातबारा उतार्‍यावर बोजा बसवण्यासाठी लाच स्वीकारतांना खाजगी पंटरला रंगेहात अटक !

May 17, 2023

१५ हजारांची लाच स्वीकारतांना विद्युत निरीक्षकाला रंगेहात पकडले !

February 28, 2024

सदाभाऊ खाेतांचा ताफा अडविणाऱ्या सांगोल्यातील हाॅटेल मालकावर गुन्हा दाखल

June 17, 2022

सोन्याचे दागिने पॉलिशसाठी देतांना सावधान ; वढोदा येथे भामट्याने महिलेची पोत लांबवली !

April 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group