धरणगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यासह धरणगावात चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना एलसीबी आणि धरणगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. गजानन सोपान शिंगाडे (वय ३२ रा. पाचन वडगाव ता. जि. जालना), करतारसिंग गुरुमुखसिंग जुनी (वय १९ रा. सरकारी दवाखान मागे धरणगाव ता.धरणगाव) ३) बलदेवसिंग बापुसिंग जुनी (वय २२ रा. सरकारी दवाखाना मागे, धरणगाव ता. धरणगाव)
पहूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३१/२०२३ भादंवि क. ४६१,३८० प्रमाणे दि. ०९/०२/२०२३ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयांत अज्ञात आरोपीतांनी फिर्यादीचे ज्वेलरी दुकानाचे शटरच्या कुलूपास लावलेले पट्टया कापून दुकानातून ४५ हजार रुपयांचे सोने-चांदीसह बेनटेक्सचे दागिने चोरी केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, धरणगाव शहरात गजानन सोपान शिंगाळे (रा. पाचन वडगाव ता. जि. जालना) हा अट्टल गुन्हेगार आलेला आहे. गजानन हा वेगवेगळया जिल्हयांत घरफोडी, चोरी, जबरी चोरी, दरोडा या सारखे गुन्हे करतो. सदर बातमीची खात्री करण्यासाठी पोउनि अमोल देवरे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, संदिर पाटील, अशरफ शेख निजामोद्दीन, सुधाकर अंभोरे, सुनिल दामोदरे, पोना/प्रविण मांडोळे, रविंद्र पाटील, अविनाश देवरे, पो.को दिपककुमार शिंदे, चापोकों/ प्रमोद ठाकुर (सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) अशांचे पथक तयार केले.
सदर गुन्हयांतील संशयीत आरोपीतांचा शोध घेत असतांना तसेच धरणगाव पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पो.स्टे. पोलीस अंमलदार पो.ना. मिलींद सोनार, पोकों/वैभव बाविस्कर अशांनी धरणगाव शहरात संशयित आरोपीतांचा शोध घेतला. त्यानंतर गजानन सोपान शिंगाडे, करतारसिंग गुरुमुखसिंग जुनी, बलदेवसिंग बापुसिंग जुनी यांना धरणगाव शहरात पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना घरफोडी चोरी बाबत विचारपुस केली असता त्यांनी फत्तेपुर ता. जामनेर, वाकडी ता. जामनेर येथे ज्वेलरीचे व इतर दुकाने फोडून त्यातील रोख रुपये व दागिने चोरी केल्याचे तसेच धरणगाव येथून एक पिकअप चारचाकी गाड़ी चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यावरुन खात्री केली असता १) पहूर पो.स्टे.गु.र.नं.३१/२०२३ भादंवि क. ४६१,३८० प्रमाणे, २) पहूर पो.स्टे. गु.र.नं.३५/२०२३ भादंवि क. ४६१, ३८० प्रमाणे, व धरणगाव पो.स्टे. गु.र.नं. ४४/२०२३ भादंवि क. ३७९ असे गुन्हे दाखल आहेत. तिघं संशयितांना अटक करून पुढील तपास कामी पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.