चाळीसगाव (प्रतिनिधी) युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर श्रद्धा असणारी, स्वाभिमानी, नीतीवंत, निर्व्यसनी, युवा पिढी घडवण्यासाठी चाळीसगाव चे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ६ जून शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त चाळीसगाव तालुक्यातून युवा मावळ्यांना किल्ले रायगड येथे नेले जाते. यंदा या वारीचे ४ वर्ष असून दिनांक ५ ते ८ जून दरम्यान ही रायगड मोहीम आयोजित करण्यात अली आहे. एखाद्या लोकप्रतिनिधी ने तरुणांसाठी सुरू केलेली रायगड वारी हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम असून यंदा देखील चाळीसगाव तालुक्यातील ३००० तरुणांना रायगड वारी घडविण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाउंडेशन मार्फत नोंदणी सुरू आहे. जास्तीत जास्त तरुणांनी ऑनलाईन
https://forms.gle/Z3XoGLSkjpRpAggs7
या लिंकवर नोंदणी करावी असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर निवड समिती मार्फत ३००० पात्र तरुणांची अंतिम निवड करण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्याची मुहूर्तमेढ जिथे रोवली व ते छत्रपती झाले तो सुवर्ण दिन ज्याठिकाणी उगवला तो दिवस म्हणजे म्हणजे किल्ले रायगड वरील शिवराज्याभिषेक दिन होय… चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून गेल्या ३ वर्षात ७००० हून अधिक तरुणांना रायगड मोहीम च्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे याची देही याची डोळा दर्शन घडवून आणण्यात आले. गेल्यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष होत असल्याचे औचित्य साधून चाळीसगाव तालुक्यातून ३५०० युवकांना किल्ले रायगडावर नेण्याचा संकल्प आमदार चव्हाण यांनी तडीस नेला. रायगड हा फक्त दगड मातीचा किल्ला नसून ते आमच्यासाठी मंदिर आहे आणि त्या मंदिराचा देव छत्रपती शिवाजी महाराज आणि ही भावना तरुणांमध्ये रुजवावी यासाठी रायगड वारी सुरू करण्यात आल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. यंदाच्या रायगड वारी तीन हजार तरुणांना शिवराज्याभिषेक सोहळा दर्शन घडेल. रायगडचे अलौकिक सौंदर्य आणि त्यात मेघनडंबरीत विराजमान युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांचे रूप बघून डोळ्याचे पारणे फिटते…
शिवरायांचे आदर्श विचार तरुण पिढीत रुजवावे यासाठी हा अट्टाहास – आमदार मंगेश चव्हाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा असणाऱ्या स्वाभिमानी, नीतीवंत, निर्व्यसनी युवा पिढी घडवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी २०१९ मध्ये ४०० होऊन तरुणांना रायगड वारी घडवून आणली होती त्यावेळी पुढील काळात दरवर्षी किमान हजार तरुणांना कपाळी रायगडची माती लावेल असा संकल्प केला होता मध्यंतरी कोविड २ वर्षे यात खंड पडला नंतर २०२२ मध्ये १५०० तरुणांना रायगड दर्शन घडवत आले तर २०२३ मध्ये शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने चाळीसगाव शहर व तालुक्याचे जवळपास ३५०० तरुणांना रायगड वारी घडवून आणली होती. यंदाही चाळीसगाव मतदारसंघातील ३००० हजार तरुणांसोबत या ऐतिहासिक दिनाचा साक्षीदार होता येणार हे माझे भाग्य असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.