मुंबई (वृत्तसंस्था) तुम्ही आत्तापर्यंत नो पार्किंग झोन ऐकला असेल, नो हॉकिंग झोन ऐकला असेल, पण नो किसींग झोन कधी ऐकला आहे का? पण हो, असाही एक झोन आहे आणि परदेशात नाही बरं का…आपल्या मुंबईतच. या मुंबईतल्या NO KISSING ZONE ची सध्या जोरदार चर्चा आहे. या ठिकाणी येणाऱ्या रोजच्या प्रेमी युगुलांमुळे स्थानिक चांगलेच कंटाळले होते.
मुंबईतील बोरिवली येथे असलेल्या सत्यम शिवम सुंदरम सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. सोसायटीत राहणाऱ्यांनी सांगितले, की लोक या ठिकाणी येऊन खुलेआम किस करायचे. स्थानिकांना आपल्या कुटुंबासोबत सोसायटीत ये-जा करणे कठिण झाले होते. अगदी डोळे बंद करून लोकांना आपल्या घरात प्रवेश करावा लागत होता. त्यानंतर याच ठिकाणी ‘NO KISSING ZONE’ असे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. असे लिहिल्यानंतर जोडपे येण्याचे प्रमाण खूप कमी झाले असे स्थानिकांनी सांगितले.
सोसायटीतील सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे, या ठिकाणी येता-जाता कपल्स किस करताना दिसून येत होते. तक्रारी वाढल्यानंतर सोसायटीच्या सदस्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून ते नगरसेवक आणि पोलिसांना पाठवले. पण, काहीच कारवाई झाली नाही. पोलिसांनी कारवाई केली नाही त्यामुळे देखील आम्हाला स्वतःच बोर्ड लावावा लागला आहे.