मुबई (वृत्तसंस्था) राज्यात आतापर्यंत तब्बल १६.१२ लाख रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. राज्यातील काेरोनामुक्तांचा एकूण आकडा १६ लाख १२,३१४ वर पोहोचला. शनिवारी २,७०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आता राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आता केवळ ८५ हजार ५०२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, शनिवारी ४,२९७ नव्या रुग्णांचे निदान झाले. एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १७ लाख ४४,६९८ वर पोहोचली आहे. शुक्रवारी १०५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर कोरोनाबळींचा एकूण आकडा ४५,९१४ वर पोहोचला आहे. राज्याचा मृत्युदर २.६३% आहे. मुंबई महानगर भागात शनिवारी १४७७ तर एकट्या मुंबईत ७२६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. एमएमआरमधील एकूण रुग्णांची संख्या आता ६ लाख ५,२३२ वर पोहोचली आहे. येथे ३६ जणांचा मृत्यू झाला. पुणे विभागात ८०५, नागपूर विभागात ७६३ आणि नाशिक विभागात ६५८ नवे रुग्ण आढळले. राज्यात आजपर्यंत १६.१२ लाखांवर रुग्णांनी कोरोनाला हरवले, सध्या केवळ ८५ हजार ५०२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.