मेष : हुशारीने काम केल्यास यश मिळेल. एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. दुपारनंतरचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे. मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. तुमचा उत्साह द्विगुणित होणार आहे. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना विचार करणे गरजे आहे. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आज आपल्या सौंदर्याचे कौतुक होईल. जुनी भांडणे मिटतील. धडाडीवर संयम ठेवा. भौतिक सुखाचा आनंद घेता येईल.
वृषभ : आज तुमच्या संपत्तीत वाढ होईल. आज तुम्हाला अनावश्यक खर्चाला सामोरे जावे लागू शकते. ज्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागेल. स्वास्थ्य कमी राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दुपारनंतर अनावश्यक खर्च संभवतात. महत्त्वाच्या गाठीभेटी नकोत. आज नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवावे लागतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल तरच तुम्हाला यश मिळेल. दुपारनंतर काहींचा मनोरंजन व करमणुकीकडे कल राहणार आहे.
मिथुन : कुटुंबासोबत बाहेर फिरण्याची योजना आखाल. सासरच्या लोकांकडून पैशांच्या बाबतीत तणावाचा सामना करावा लागू शकतो. उत्साही व आनंदी राहणार आहात. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक प्रभाव राहील. ज्यामुळे शारीरिक त्रास वाढेल. व्यवसायानिमित्त बाहेर जावे लागेल. कामात नवीन सौदे निश्चित कराल. दुपारनंतर प्रियजनांकडून विविध लाभ होणार आहेत. प्रवासात फायदा होणार आहे. मानसिक संतुलन हरवू देऊ नका. पायाच्या दुखण्याकडे लक्ष द्या. काही किरकोळ समस्यांतून मार्ग निघेल.
कर्क : सुरुवातीला नात्यात काही अडथळे येतील. परंतु विचारांशी सहमत झाल्यास प्रश्न मिटतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. कामे मार्गी लागतील. तुमचा प्रभाव वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत असल्याने व्यवसायात प्रगती होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. कामे यशस्वी होणार आहेत. व्यक्तिमत्वाची छाप पडण्यात यशस्वी व्हाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. संयमाने व धीराने निर्णय घ्यावा लागेल.
सिंह : कामाच्या ठिकाणी लक्ष दिल्यास प्रभाव आणि प्रसिद्धी वाढेल. मित्रांसोबत केलेला प्रवास आनंददायी असेल. मनोबल कमी असणार आहे. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. वादविवादात सहभाग नको. कामाचा ताण व दगदग कमी होईल. विद्यार्थी आज शिक्षकांच्या मदतीने भविष्याची योजना करतील. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. दुपारनंतर प्रियजन भेटणार आहेत. नोकरी व व्यवसायात मोठी संधी चालून येईल. तुमच्या बाबतीत संशय निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.
कन्या : बाहेरच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. अन्यथा पोटदुखीचा त्रास उद्भवेल. जोडीदारासोबत समन्वय साधाल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. दुपारनंतर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल. आजचा दिवस तुमचा व्यस्त असेल. कुटुंबाच्या गरजांवर थोडे पैसे खर्च करावे लागतील. तुमच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडेल. नवीन प्रयोगाला यश मिळेल. मित्रांचा सल्ला ग्राह्य मानाल. मौल्यवान भेटवस्तू मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
तुळ : उत्पन्न आणि खर्चात समतोल राखावा लागेल. अन्यथा संपत्ती कमी होईल. भविष्यात आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. अस्वस्थता कमी होईल. दुपारनंतर आजचा दिवस तुम्हाला अनुकूल असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज राजकीय क्षेत्रात असणाऱ्या लोकांना यश मिळेल. त्यामुळे भविष्यात फायदा होऊ शकतो. दुपारनंतर वैवाहिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. कष्टाने मान मिळवाल. दूरच्या नातेवाईकांशी संपर्क होईल. तुमचा प्रभाव वाढेल. व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
वृश्चिक : नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करतील. जीवनात आनंद येईल. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मनाबेल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. दुपारनंतर काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहिल. काहीजण मनोरंजन व करमणुकीसाठी खर्च करणार आहेत. बौद्धिक गुण वापरून कामे करावीत. व्यस्त दिनक्रमामुळे थकवा जाणवेल. नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढेल. आजचा दिवस शुभ राहील.
धनु : नोकरीमध्ये काम करणाऱ्यांना कामात एकाग्रता ठेवावी लागेल. अधिकाऱ्यांना बोलण्यातून खुश कराल. दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी पडतील. आनंदी व आशावादी राहाल. प्रसन्नता लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विविध लाभ होतील. मालमत्तेशी संबंधित असणारे वाद आज सुटतील. व्यवसायात पैसे मिळण्यात अडचणी येतील. दुपारनंतर प्रियजन भेटतील. प्रवास सुखकर होतील. विचारपूर्वक सल्ला द्या. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. जुनी येणी असतील तर त्याचा पाठपुरावा करा. ऐनवेळी येणार्या समस्या सोडवता येतील.
मकर : तुमच्या व्यवस्थापन योजनेला गती मिळेल. कामाच्या ठिकाणी शत्रूंपासून सावध राहा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. जिद्दीने कार्यरत राहाल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत स्वास्थ्यकर असणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकू नका. कौटुंबिक सुव्यवस्था राखण्यासाठी वेळ मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. धार्मिक गोष्टीत स्वत:ला रमवाल. जोडीदाराकडून चांगला लाभ होईल. कार्य सिद्धीस साशंकता नको.
कुंभ : तुम्हाला नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्या लोकांना यश मिळेल. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. काहींना गुप्त वार्ता समजतील. जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. लव्ह लाईफ आनंदमयी असेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष द्या. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक आरोग्य टिकवाल. नातेवाईकांशी चांगले धोरण ठेवाल. निर्णय क्षमतेत वाढ होईल. कौटुंबिक मतभेद दूर होतील.
मीन : नशिबाची आज तुम्हाला पूर्ण साथ मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणात येणारे अडथळे आज दूर होतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. दुपारनंतर कुटुंबाकरिता वेळ देऊ शकणार आहात. मनोबल उत्तम राहील. तुमची आर्थिक स्थिती मध्यम राहिल. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे टाळा. वैचारिक मतभेद वाढतील. प्रवास सुखकर होतील. अकारण खर्चाची शक्यता. मुलांवरील खर्च वाढू शकतो. उगाचच मन खिन्न होण्याची शक्यता. भागीदारीच्या व्यवसायात विश्वास महत्त्वाचा ठरेल.