मेष : व्यवसाय करणारे लोक आज काही बदल करतील. राजकारणाशी संबंधित लोकांना जनतेचा पाठिंबा मिळेल. आनंदी राहण्यासाठी उत्तम कारण मिळेल. प्रवासात काहींना लाभ होणार आहेत. आज सामाजिक आणि राजकीय कार्यात रुची वाढेल. वैवाहिक जीवनात आनंदी रहाणार आहात. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत.
वृषभ : एकाचवेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. तुम्ही धैर्याने सामोरे जाल. मनोबल कमी असल्याने कामात चुका होण्याची शक्यता आहे. हितशत्रूवर मात करु शकणार आहात. आज सर्व कामे काळजीपूर्वक करा. वाहने चालविताना काळजी घ्यावी. मानसिक स्वास्थ्य कमी राहील.
मिथुन : तुमचे मन प्रसन्न राहिल. मुलांच्या लग्नाचा विचार कराल. घरात आनंदाचे वातावरण असेल. आज तुम्ही जितके कष्ट कराल तितका जास्त फायदा होईल. काहींना अनपेक्षित धनलाभ होईल. आपल्याला नवीन परिचयांचा फायदा होणार आहे. अनेकांचे आपल्याला सहकार्य लाभणार आहे.
कर्क : तुमची बुद्धिमत्ता आणि विवेकाच्या जोरावर व्यवसाय कराल. नवीन काम शोधण्यास सुरु कराल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला प्रतिष्ठा लाभणार आहे. मित्रांसोबत वेळ घालवाल. वरिष्ठांच्या सहकार्याची आवश्यकता भासेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे.
सिंह : तुमची कीर्ती वाढेल. तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. वादाच्या प्रसंगी रागावर नियंत्रण ठेवा. मनोबल व चिकाटी उत्तम असणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज तुम्हाला काही मौल्यवान वस्तू मिळतील. चिकाटीने कार्यरत रहाणार आहात. प्रवास सुखकर होतील.
कन्या : खर्चात वाढ होऊ शकते. इच्छा नसताना काम करावे लागेल. व्यवसायात पैसे अडकतील. मनोबल व आत्मविश्वासाची कमी जाणवणार आहे. आज तुम्हाला विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. महत्वाची कामे आज नकोत. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी.
तुळ : तुमच्या समस्येत वाढ होईल. नोकरदार लोकांच्या सूचनांचे पालन केले जाईल. तुम्हाला अधिकाऱ्यांकडून बढती मिळेल. आनंदाने कार्यरत रहाणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज तुम्हाला आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. काहींचा सर्वत्र प्रभाव राहणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत.
वृश्चिक : आर्थिक स्थिती हानिकारक ठरु शकते. कुटुंबात शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. कामाचा ताण वाढल्याने मन अस्वस्थ होईल. काहींना नैराश्य जाणवेल. आज संध्याकाळी तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. ज्यामुळे तुमचे मन उत्साही राहिल. आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. मानसिकता सकारात्मक ठेवावी.
धनु : तुम्ही जवळच्या नातेवाईकांकडे जाल. व्यवसायात काही विशिष्ट कामाची काळजी वाटेल. आज भावाची मदत घ्यावी लागेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक मेहनतीचा असेल. आनंदी घटना अनुभवाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील.
मकर : मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. घरात वाद झाला असेल तर संयम राखा. मानसिक सकारात्मकतेमुळे अनेक कामात सुयश लाभणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. आज तुम्ही व्यवसायातील नफ्याने समाधानी व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साही राहणार आहात.
कुंभ : नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांच्या मदतीने पदोन्नती मिळेल. मुलांसोबत बाहेर फिरण्याचा प्लान कराल. चिकाटीने कार्यरत राहिल्याने अनेक कामे पूर्ण होतील. आजचा दिवस भविष्यातील नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा आहे. काहींना भाग्यकारक अनुभव येणार आहेत. प्रवासाचे योग येणार आहेत. अचूक मार्गदर्शन लाभेल.
मीन : तुम्हाला थकवा आणि डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागेल. आज तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. कौटुंबिक जीवनात अपेक्षित सुसंवाद राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. आज तुम्ही दिवसभर व्यवसायात व्यस्त असाल. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत