मेष : कामाच्या व्यापामुळे कुटुंबियांना वेळ देऊ शकणार नाही. तुम्हाला यश मिळेल आणि नवीन संधी देखील मिळतील.वडिधाऱ्यांच्या आशिर्वादामुळे तुम्हाला सरकारकडून मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर धावपळ करावी लागेल.
वृषभ : तुमच्या सुखसोयींवर आज तुम्ही बऱ्यापैकी पैसे खर्च करणार आहात. घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल. तुम्हाला यश मिळेल आणि नवीन संधी देखील मिळतील. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल.
मिथुन : आज जेव्हा तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या मदतीची गरज आहे, त्याचवेळी कोणीही मदत न केल्यामुळे तुम्ही दुखावले जालं आणि तुमचा त्यांच्यावरील विश्वास उडेल. कामातील अपेक्षितता वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील.
कर्क : आज कुटुंबातील किंवा व्यवसायातील काही शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील पण त्यात ते यशस्वी होऊ शकणार नाहीत. उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. धनवृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही.
सिंह : नोकरीत कामाचा ताण जास्त असल्याने तुम्ही व्यस्त असाल आणि जोडीदारासाठी वेळ काढू शकणार नाही, ज्यामुळे जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो. बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल.
कन्या : आज विवाहयोग्य व्यक्तींकडून विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील, ज्याला कुटुंबातील सदस्यांकडून मान्यता मिळू शकेल. खर्च समाधानकारक असेल. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल.
तूळ : सरकारी नोकरी करणाऱ्यांनी त्यांच्या कामाकडे नीट लक्ष द्यायाल हवे अन्यथा अनंत अडचणींचा सामना करावा लागेल. एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. मित्राचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल.
वृश्चिक : रखडलेले पैसे मिळाल्याने आनंद होईल. आज मुलाची उत्तम प्रगती पाहून मन प्रसन्न होईल. झोपेची तक्रार जाणवेल. आज संध्याकाळी प्रवासादरम्यान तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान व प्रतिष्ठा वाढेल.
धनू : आज जोडीदार खास तुमच्यासाठी पार्टीचे आयोजन करेल. घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूति घ्याल. मानसिक शांतता लाभेल. भावंडांशी स्नेहभाव वाढेल. जर तुम्ही भागिदारीत व्यवसाय करत असाल तर पार्टनरवर बारीक लक्ष ठेवा. मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील.
मकर : अचानक उद्भवणार्या खर्चावर आळा घालावा. गोड बोलून कामे करून घ्याल. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा. वडिलोपार्जित मालमत्ता मिळाल्याने आज तुम्हाला आनंद होईल, स्वतःहून कोणाला ही सल्ला द्यायला जावू नका. आज अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
कुंभ : आज संध्याकाळी मित्रांसोबत पिकनिकला जाऊ शकता. आज तुमच्या चिडचिड्या स्वभावामुळे तुमचे कुटुंबीय आनंदी राहणार नाहीत. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. अचानक खर्चात भर पडू शकते. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची व नवीन वस्त्रपरिधान करण्याची संधी लाभेल.
मीन : विद्यार्थ्यांनी नीट अभ्यास केल्यामुळे तसेच त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे शिक्षक खुष असतील. महिलांना माहेरच्या बाजूने मानसन्मान मिळेल. उगाच रागराग करू नका. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. तणाव दूर होऊ शकेल. कामातील उत्साह वाढेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुखशांती नांदेल.