मेष : कुटुंबासोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील. भागीदारीत सुयश लाभेल. बोलण्याने वाद सुटतील. नोकरदार लोक त्यांचे काम आनंदाने करतील. प्रवास सुखकर होणार आहेत. कामे मार्गी लावू शकणार आहात. मनोबल वाढणार आहे. कौटुंबिक कलह वाढेल. नोकरदार लोकांना आर्थिक बाबतीत फायदा होईल.
वृषभ : महत्त्वाचा प्रोजेक्टवर काम कराल. ज्यामुळे पूर्ण दिवस व्यस्त राहाल. अनावश्यक कामात वेळ वाया जाणार आहे. एखाद्या बाबतीत तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. आज अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. महत्त्वाची कामे आज नकोत. काहींची धार्मिक प्रगती होईल. आनंदात घालवलेले क्षण लक्षात राहातील. दानधर्म कराल. तुम्ही कोणाकडून पैसे उधारी घेतले असतील तर ते आज परत करा.
मिथुन : नातेवाईकांशी चांगला संवाद साधाल. मित्रांसोबत वेळ घालवाल. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. विविध लाभ होतील. पैशाच्या बाबतीत फायदा होईल. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरणार आहेत. कामात यश मिळेल, मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. काहींना विविध लाभ होणार आहेत. आपल्या आई-वडिलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.
कर्क : आज काही नवीन आणि आव्हानात्मक कामाला समोरे जावे लागेल. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. सार्वजनिक कार्यात प्रभाव राहील अपेक्षित गाठीभेटी घेण्यास अनुकूलता लाभेल. गुंतवणूकीतून चांगला नफा मिळेल. व्यवसायात पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. आपली मते इतरांना पटवून द्याल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आज तुम्हाला अस्थम्याचा त्रास जाणवू शकतो.
सिंह : आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांसाठी आनंदी बातमी ऐकू येईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश लाभेल. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही कामात अतिउत्साह दाखवू नका. प्रवास सुखकर होणार आहेत. नातेवाइकांच्या गाठीभेटी घेऊ शकाल. काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येईल. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला महिला कर्मचाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल.
कन्या : आज तुम्ही अतिउत्साहात काम केल्याने गैरसमज निर्माण होतील. कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक व्यवहारास दिवस अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. उत्पन्न आणि खर्चाचे बजेट तयार करा. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक जीवनात आनंद लाभेल. भूतकाळासंबंधित जुन्या आठवणी आज तुम्हाला त्रास देतील.
तुळ : कौटुंबिक समस्यांबद्दल काळजी वाटेल. त्या बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. पैशाशी संबंधित बाबींमध्ये फायदा होईल. इच्छेनुसार खर्च करण्याची संधी मिळेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यापारी वर्ग आपल्या कामाच्या बाबतीत फार सतर्क आणि उत्सुक असतील.
वृश्चिक : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील. एखाद्या बाबतीमध्ये तुमची चिडचिड होणार आहे. मनाविरुद्ध घटना घडेल. खर्च वाढतील. आज तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
धनु : आज दिवसभर भावनिक चढ-उतार असू शकतात. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. खर्चाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. समाधानाच्या भावना मनात ठेवा. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना अचानक धनलाभ होईल. जे लोक मार्केटिंग क्षेत्रात काम करतायत त्यांना आज चांगला नफा मिळेल.
मकर : आज नवीन वस्तू खरेदी करण्याची संधी मिळेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आर्थिक बाबतीत नफा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वरिष्ठांबरोबर सुसंवाद राहील. विद्यार्थी आज अभ्यासात व्यस्त असतील. गुंतवणुकीची व प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. प्रवास होतील. आज कोणत्याही ताणतणावापासून दूर राहा.
कुंभ : पैशांच्या बाबतीतही फायदा होईल. तुमच्या इच्छेनुसार खर्च करण्याची संधी मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. अस्वस्थता संपेल. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. प्रवासाचे योग येतील. जिद्द वाढणार आहे. अनुकूलता लाभणार आहे. आज कोणताही कागदोपत्री व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रं नीट वाचून घ्या. मगच सही करा.
मीन : आज आर्थिक परिस्थिती समजून घेऊन खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मात्र, दैनंदिन कामे रखडणार आहेत. वादविवादात सहभाग टाळावा. कौटुंबिक कलह वाढेल. नोकरदार लोकांना आर्थिक बाबतीत फायदा होईल. प्रवासात एखादा मनस्ताप संभवतो. वाहने सावकाश चालवावीत. एखादी अप्रिय घटना संभवते. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. परदेशातून तुम्हाला नोकरीची ऑफर मिळू शकते.
















