मेष : आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही आपली मते व आपले विचार स्पष्टपणे मांडणार आहात. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुमच्या, मानसिकतेमध्ये काही सकारात्मक बदल होणार आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवताना काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराला वेळ द्या.
वृषभ : आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. मानसिक उद्विग्नता राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी आज सावध राहावे. काहींना अनावश्यक कामात आपला वेळ वाया जातोय, ही भावना त्रास देणार आहे. कामाला पुढे नेण्यासाठी नवीन योजना अंमलात आणाल. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोतही वाढतील.
मिथुन : आजचा दिवस चांगला जाईल. वैचारिक परिवर्तन होणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील. काहींना आपल्या बौद्धिक क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. आरोग्य उत्तम असणार आहे. कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्यासोबत काहीही चुकीचे घडू शकते. मित्रांमध्ये गैरसमज निर्माण होतील.
कर्क : व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुमची एखादी डील फायनल होऊ शकते.मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. तुमची इच्छा नसतानाही आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा उत्साही सहभाग राहील. मान-सन्मान लाभेल. दैनंदिन कामे होतील. कामात नवीन उंची गाठण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळेल. व्यवसायात पैसे कमावण्याचे नवे मार्ग खुले होतील.
सिंह : आजचा दिवस चांगला जाईल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. तुमचे आरोग्य उत्तम असणार आहे. नोकरदारांना नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून मिळालेल्या संधीचा फायदा घेणार आहात. प्रवास सुखकर होतील. पगारवाढीसाठी कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल. उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये बदल घडतील. मालमत्तेसंबंधित प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगा.
कन्या : कामात तुमची कार्यक्षमता तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायातील येणी वसूल होतील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्यांना चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुम्हाला तुमच्या विश्वासार्हतेवर विश्वास ठेवावा लागेल. नवीन प्रकल्पांबद्दल विचार करावा लागेल.
तुळ : व्यापारी आणि व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज जास्त ताण घेऊ नका. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. स्वास्थ्य लाभेल. अनावश्यक काळजी करण्याऐवजी एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. नोकरदार लोक त्यांच्या कामात समर्पित राहातील.
वृश्चक : नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी दिलेल्या जबाबदाऱ्यांबाबत गांभीर्य ठेवावं लागेल. मनोबल कमी राहील. आपले श्रम वाया जातील. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. काहींचा आराम करण्याकडे तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायात उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांनाही आज गुंतवणूक केल्यास फायदा होईल. पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस शुभ असेल.
धनु : व्यावसायिकांना आपलं काम पूर्ण करण्यासाठी त्यांचं नेटवर्क स्ट्राँग ठेवावं लागेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. तुमच्या प्रियजनांसाठी आपण आवर्जून वेळ काढाल. आज अभ्यासातील आव्हानांना घाबरू नका, त्यांना सामोरे जा. आर्थिक लाभ होणार आहेत. बौद्धिक प्रभाव राहील. प्रियजनांशी संवाद साधण्यासाठी वेळ काढा. घरगुती गोष्टींमध्ये सावध राहा. आरोग्याची काळजी प्रकर्षाने घ्यावी. नियमित व्यायाम करा.
मकर : आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी व्हाल. आरोग्य उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद आणि चर्चेपासून स्वतःला दूर राहा. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे विनासायास पार पडणार आहेत. आज फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा नुकसान सहन करावं लागेल. कामावर लक्ष केंद्रित करुन ते पूर्ण करण्याचे काम करा. कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळेल. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.
कुंभ : फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा नुकसान सहन करावं लागेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना अनपेक्षितपणे अनुकूल संधी प्राप्त होईल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. विद्यार्थ्यांची इच्छित कामं पूर्ण होऊ शकतात. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. स्वास्थ्य व समाधान लाभेल. बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. काम वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब कराल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
मीन : आजचा दिवस चांगला जाईल. प्रवासाचे नियोजन आज नको. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल.आजचा दिवस चांगला जाईल. एखाद्या अप्रिय घटनेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. खरेदीसाठी घराबाहेर पडाल. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासावर लक्ष द्यावे. तुमचे ज्ञान इतरांसोबत शेअर करा.